लखन केशवानी ठरले मृत्युंजय दूत

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3 डिसेंबर) :- पोलीस विभागाला महत्त्वाच्या वेळी सहकार्य करणे, अपघात समयी सुवर्ण तासात महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे याबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा मृत्युंजय दूत पुरस्कार लखन केशवानी यांना नुकताच प्रदान करण्यात आला

    वरोरा शहराच्या सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले प्रसंगी निराधारांवर अंत्यसंस्कार करणारे, 24 तास सेवा ग्रुपचे अध्यक्ष लखन केशवानी यांना पोलीस अधीक्षक (महामार्ग), प्रादेशिक विभाग नागपूर त्यांनी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

चंद्रपूर- नागपूर महामार्गावर अनेक अपघात होतात. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णालयात भरती करणे, वैद्यकीय सेवा पुरविणे आणि पोलिसांना सहकार्य करणे याकरिता केशवानी यांना हा पुरस्कार पोलीस अधीक्षक (महामार्ग ) यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक खैरकर, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गौरकार यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला. केशवानी यांचे विविध सामाजिक संघटना, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी आदिनी अभिनंदन केले आहे.