ज्यादा पैसे कमवीण्याच्या नादात गरीब जनतेची आर्थिक लूट थांबवा…श्री विपिन लोणकर

🔸डॉक्टर , वैद्यकीय अधिकारी यांचा मनमानी कारभार 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव बू तसेच परिसरात असलेल्या ग्रामीण भागात साथीच्या रोगाची लागण सुरू असून प्रत्येक घरामध्ये डेंग्यू , मलेरिया , टायफॉइड , ताप. सर्दी , खोकला , अश्या अनेक आजार प्रत्येक गावात गावातील प्रत्येक कुटुंबात चार ते पाच रुग्ण दररोज पाहायला मिळत आहे .

      गोर गरीब शेत मजूर यांच्या देखील घरात सर्वच सदस्य आजाराने ग्रासले असून त्यांना उपचार करण्यासाठी मोठी दररोज कसरत करावी लागत आहे तर प्रत्येक रुग्णाला दोन ते तीन वेळा उपचार करावा लागत आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबात पैश्याची फार मोठी चणचण भासत आहे .. असले नसले पैसे सर्व पैसे उपचाराकरिता दवाखान्यात लागत असल्याने अनेकांना दोन वेळच्या जेवणाची शिक्षणाची , व्यवस्था करणे देखील कठीण झाले असल्याचे काही रुग्णांनी सांगितले .

आजाराने रुंगांची कंबरडे मोडून दिवाळ निघालं तर शेगाव येथील डॉक्टर वैद्यकीय अधिकारी यांची मात्र दररोज दिवाळी दसरा साजरा होत असून त्यांच्या तिजोरीत भर पडत आहे .आरोग्य सेवा ही सेवा नसून गोरख धंदा बनला असल्याचे महा भयानक चित्र डोळ्या समोर दिसत आहे तेव्हा पैसे वाल्याचा इलाज कुठे ही होतो परंतु गरीब जनतेला रुग्णाला उपचारविनाच मरणागती जावे लागते.

          उपचारासाठी आलेल्या प्रत्येक गोर गरीब जनतेला रुग्णाला एक दवाखाना एक उपचार किमान १५०० ते २००० रुपयांचा खर्च येत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शेगाव बू ही वरोरा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे शिवाय या गावाशी ५० ते ६० गावाचा संपर्क येत असतो वैद्यकीय उपचाराकरिता देखील रुग्णाला शेगाव बू येथेच यावे लागते .

सद्या परिसरात रोगाचे थैमान असल्याने प्रत्येक दवाखान्यात रुग्णाची लाईन असून सर्वच दवाखाने रुग्णांनी भरलेले असल्याचे पाहायला मिळत आहे . तर या ठिकाणी छोटे मोठे पकडून किमान दहा खाजगी रुग्णालय दवाखाने आहेत . सर्वस्वी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी हे सलाईन , औषधी , इंजेक्शन , गोळ्या , इत्यादी देऊन रुग्णकडून मुबोली रक्कम वसूल करीत असल्याचा प्रकार समोर येत आहे . तेव्हा गोर गरीब , मजूर यांच्या मिळकतीचा विचार लक्षात घेऊन गरीब जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावी अशी मागणी येथील युवा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्री विपिन लोनकर यांनी केली आहे .

 “वरोरा तालुक्यातील शेगाव बू हे गाव सर्वात मोठे गाव आहे शिवाय मोठी बाजारपेठ देखील आहे परंतु या ठिकाणी मोफत वैद्यकीय सुविधा आरोग्य सुविधा नसल्याने शोकांतिकाची बाब आहे . शिवाय शासनाने करोडो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी केली परंतु ही इमारत गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात आहे . तेव्हा किमान गोर गरीब जनतेच्या आरोग्याचा मिळकतीचा पैशाचा विचार लक्षात घेऊन शेगाव येथे मोफत वैद्यकीय सेवा आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात यावी.” श्री. विपिन लोनकर.