माय बाप सरकार निराधारांचा दसरा,दिवाळी अंधारात जाणार काय?युवा काँग्रेस कार्यकर्ता शुभम गजभिये यांचा सरकारला सवाल

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16 ऑक्टोबर) :- निराधारांना जून-जूलै महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा लाभार्थ्यांच्या बँकेसह तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात आहे दिवाळी सण महिनाभरावर येवून ठेपला आहे तरी दसरा अगदी काही दिवसांनी आहे.असे असले तरी ऐना सणासुदीच्या दिवसातच शासनाकडून निराधार नागरिकांचा निधी रखडला आहे.

जून-जूलै महिन्यांपासून मानधन खात्यात जमा न झाल्याने यंदाची दसरा,दिवाळी अंधारात जाणार काय ?असा सवाल युवा काँग्रेस कार्यकर्ता शुभम गजभिये व निराधार लाभार्थी उपस्थित करित आहे. दिव्याग,वृध्द निराधार महिलान करिता शासनाकडून श्रावणबाळ,संजय गांधी,निराधार योजना अशा प्रकारे योजना राबविण्यात येतात. शासनातर्फे केंद्र सरकार व राज्य सरकारकडून या लाभार्थ्यांना प्रतीमाहीन१०००रुपये मानधन दिले जाते.

आता या निधीत शासनाकडून वाढ झाली असून १५०० रुपये मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र,अद्यापही वाढीव मानधन बेपत्ता झाले की काय महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी यांच्या खात्यात रक्कम जमा होईल,असे शासनाकडून सांगितले गेले होते.

मागील काही महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने निराधारांची मोठी कसरत करून जिवन जगावे लागत आहे.चार महिन्यांपासून मानधनाची रक्कम रखडल्यामुळे महिन्याचे बजेट कसे करावे. हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.आढवड्या भरात दसरा आणी महिनाभरावर दिवाळी सण आला आहे.मात्र अद्यापही मानधनाची रक्कम आली नाही.

लाभार्थी दर आठवड्याला बँकेत जावून मानधनाच्या रकमेसाठी विचारणा करत आहेत.मात्र प्रत्येक वेळी तुमचे मानधन आले नाही,असे सांगून त्यांना परत पाठविण्यात येत आहे.सरकार एकीकडे‌ लाभार्थी यांना जीवनमान उंचावण्यासाठी योजना कार्यान्वित करून निधीत देखील वाढ करण्याची घोषणा करत असताना दुसरीकडे मात्र मानधनाची रक्कम रोखून ठेवत असल्याने हा निराधारांवर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप युवा काँग्रेस कार्यकर्ता शुभम गजभिये यांनी केला आहे.तरी शासनाने लवकरात लवकर लाभार्थी यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची मागणी शुभम गजभिये यांनी केली आहे.