शेतकरीपुत्र शेतकऱ्याच्या मागण्यासाठी करावे लागले उपोषण 

63

🔸भावी आमदार नेते बॅनर बाजीत हळदी कुंकवात मग्न 

🔹पिक विमा कंपनीला नमविले. ग्रामपंचायत मध्ये याद्या प्रसिद्ध 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.18 फेब्रुवारी) :- वरोरा तालुक्यातील एका छोट्याश्या गावातील युवक शेतकरी तसेच शेतकरी पुत्र हा सदैव शेतकऱ्याच्या हितासाठी काहीनाकाही प्रयत्न करीत असतो तसेच शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देत असतो. तसेच आज च्या परिस्थीत झालेले शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव बँकेकडून होणारी पिळवणूक अश्या अनेक समस्या लक्षात घेऊन आंदोलन पुकारले व शासनाला झुकवले. व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केले . 

       परिसरात पहले असता सर्व नेते पुढारी हे उद्याचे आमदार समजतात जनतेला जवळीक करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करीत आहेत शिवाय गाव तिथे कार्यक्रम गाव तेथे पोष्टर बाजी नक्कीच असते . परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र कुणीही लक्ष देत नाही हे मात्र शोकांतिका करिता शेतकऱ्याच्या मागणी साठी शेतकरी पुत्रालाच आंदोलन करून न्याय मागवा लागला.. 

सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी वरोरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण उभारले , कोणत्याही राजकीय पक्षाचा व नेत्यांचा आधार न घेता आसाळा येथील राहवासी असलेला साधारन शेतकरी काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण किशोर डुकरे यांच्या रूपाने पाहायला मिळाले. उपोषणा च्या पाचव्या दिवशी चार मागण्या शांततेने मान्य करून दाखवल्या.

त्यातील पीक विमाच्या मागणीची दखल कृषी विभाग व विमा कंपनीने घेत शनिवारी वरोरा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये यादया प्रसिद्ध केल्याने किशोर डुकरे यांच्या आंदोलनाचं फलित झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यात उमटू लागल्या. शेतकऱ्यांसाठी तळमळ असणाऱ्या या गरीब नेतृत्वाला शेतकऱ्यांनी डोक्यावर उचलून धरले आहे. आंदोलन जरी पाचव्या दिवशी संपले असले तरी शेतकऱ्या विषयीची तळमळ त्यांनी बोलून दाखवली.

कापसाला दहा हजार रुपये भाव, शेतीतील पांदण रस्ते काढून देणे, वरील मागण्या मान्य न केल्यास पुन्हा शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचा इशाराही पत्रकारांशी बोलून दाखवला.

या आंदोलनात सहभागी झालेला मित्रपरिवार व सहकार्याचे त्यांनी धन्यवाद मानले असून शेतकऱ्यांसाठी याच पद्धतीने लढण्याचे आश्वासन शेतकरी मित्रांना त्यांनी यावेळी दिले. त्यांची प्रकृती ठीक असून ते स्वभावी आसाळा येथे गेले आहे.