स्नेह मिलन सोहळ्यातून विविध विषयातील मार्गदर्शनाची संधी – डॉ. विजयराव देवतळे

94

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि .6 फेब्रुवारी) :- माजी विद्यार्थी आणि त्यांना शिक्षण देणारे तत्कालीन गुरूजन यांनी त्यांच्या सेवा कालावधीत विविध अनुभव संपादित केलेले असते. स्नेह मिलन सोहळयात माजी विद्यार्थी आणि त्यांचे तत्कालीन गुरुजन उपस्थित राहात असल्याने त्यांच्याकडील अनुभव व ज्ञान यातून विविध विषयातील मार्गदर्शनाची संधी कार्यरत शिक्षक व विद्यार्थांना मिळत असते. असे प्रतिपादन ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोराचे अध्यक्ष डॉ. विजयराव देवतळे यांनी केले.

    तालुक्यातील जेना येथील कर्मवीर विद्यालयात वर्ग १०वीचे माजी विद्यार्थी ( सत्र१९७९-८० ) यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोराचे अध्यक्ष डॉ. विजयराव देवतळे बोलत होते.

याप्रसंगी व्यासपिठावर सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक तथा राज्य पुरस्कार प्राप्त सेवा निवृत्त मुख्याध्यापक आचार्य ना.गो. थुटे , सोहळ्याचे उद्घाटक डॉ. विजयराव देवतळे, प्रमुख मार्गदर्शक आ. नि. महाविद्यालयातील से. नि. मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत पाटील, तत्कालीन गुरूजन तथा सत्कार मुर्ती पुंडलीक नन्नावरे, विठ्ठल रोडे आणि मारोतराव खिरटकर , प्रमुख अतिथी ग्रा. शि. प्र. मंडळाचे सचिव गोपाळराव एकरे, सदस्य रामदास डहाळकर,दिनकरराव ठेंगणे व उत्तमराव झाडे, से. नि. मुख्याध्यापक मदनराव ठेंगणे आणि क. वि.जेनाचे मुख्याध्यापक सुनिल लेडांगे प्रामुख्याने उपस्थित होते.

     दिप प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पन करून सोहळयाचे उद्घाटन करण्यात आले. सु.वि. साठे आणि संच यांनी आचार्य ना.गो. थुटे यांनी रचलेले सुमधूर स्वागत गीत सादर केले.

     सोहळ्याचे उद्घाटक डॉ. विजयराव देवतळे यांनी स्नेह मिलन सोहळा आयोजीत केल्या बद्दल माजी विद्यार्थांची भरभरुन प्रशंसा केली. तब्बल त्रेचाळीस वर्षानंतर सर्व वर्ग मित्र परीवारांसह एकत्रीत आले. सदर स्नेह मिलन सोहळा सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला असून ग्रा. शि. प्र. मंडळाद्वारा संचालित प्रत्येक विद्यालयात अश्या प्रकारे स्नेह मिलन सोहळे आयोजित करावे. असे आवाहन केले.

        याप्रसंगी तत्कालीन गुरूजन तथा सत्कार मुर्ती पुंडलीक नन्नावरे, विठ्ठल रोडे आणि मारोतराव खिरटकर , व्यासपिठावरील सर्व मान्यवर यांच्यासह, तत्कालीन शिक्षक पुरुषोत्तम तामगाडगे व जनार्धन कांबळे, तत्कालीन कर्मचारी प्रेमदास पुनवटकर,तत्कालीन जि.प. शाळा मुख्याध्यापक माधवराव दोडके व उत्तमराव झाडे, संगीत कला मंचचे सु.वि. साठे आणि संच यांचा शाल, श्रीफळ , सन्मान चिन्ह व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदाना बद्दल अनुक्रमे प्रा. धनराज आस्वले,रविंद्र शिंदे आणि नरेंद्र पढाल यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.मान्यवरांच्या शुभहस्ते सर्वच माजी विद्यार्थांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. 

       याप्रसंगी तत्कालीन गुरूजन तथा सत्कार मुर्ती पुंडलीक नन्नावरे, विठ्ठल रोडे आणि मारोतराव खिरटकर यांनी माजी विद्यार्थांनी आयोजित केलेल्या स्नेह मिलन सोहळयाचे कौतुक केले. या प्रसंगातुन आम्हाला जगण्याची नवी उमेद मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली

प्रमुख अतिथी ग्रा. शि. प्र. मंडळाचे सचिव गोपाळराव एकरे, सदस्य रामदास डहाळकर, दिनकरराव ठेंगणे आणि उत्तमराव झाडे यांनी समयोचित मार्गदर्शन करीत स्नेह मिलन सोहळा आयोजना संबंधी प्रसन्नता व्यक्त केली. या सोहळ्यात सहकुटूंब माजी विद्यार्थी, विविध शाळांचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर, गावातील व परीसरातील जेष्ठ नागरिक , सामाजिक कार्यकर्ते फार मोठ्या संख्येत सहभागी झाले. सोहळ्याचे सुत्रसंचलन प्रभाकर वाघ, प्रास्ताविक सुर्यभान पिंपळकर आणि आभार प्रदर्शन पोमेश्वर टोंगे यांनी केले. 

“माजी विद्यार्थांनी आपल्या शाळा समृध्द कराव्या : प्रा श्रीकांत पाटील” :- शिक्षकी पेशा हा भाग्यवान व श्रीमंत पेशा आहे. शैक्षणिक जिवनात निर्णायक ठरलेल्या आपल्या शाळा सध्य स्थितीत कुठल्या अडचणीत आहे. त्या संबंधीची माहीती घेवून माजी विद्यार्थांनी आपल्या शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करावा. या प्रयत्नातून आपल्या शाळा समृध्द कराव्या. संगणकातून माहिती मिळते, परंतू त्यामधून संस्कार मिळत नाही. यामुळे पुढील पिढीला योग्य संस्कार मिळत नाही. अश्या स्नेह मिलन सोहळ्यातून परस्पर स्नेहभाव वाढून आचार विचारांचे आदानप्रदान होत असते. या सोहळयात माजी विद्यार्थी त्यांच्या सहचारीणीह सहभागी झाले आहे. ही बाब अत्यंत गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा आ. नि. महाविद्यालयातील से. नि. मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत पाटील यांनी याप्रसंगी केले. 

“जेना परीसरातील एक अविस्मरणीय सोहळा” : आचार्य ना.गो. थुटे :- जेना गावासह परीसरातील बहुतांश गावांनी या सोहळ्यात सहभाग दर्शविला. वरोरा -भद्रावती महामार्गावरील किलोनी गावापासून थेट जेना गावापर्यंत या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंडळींचे स्वागत करण्यासाठी स्वागत फलक झळकले, या निमित्माने जेना गावाला उत्सवाचे स्वरूप आले. गावात सुध्दा स्वागत फलक लावण्यात आले. रांगोळ्या टाकूण मार्ग सुशोभीत करण्यात आले. भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. हा स्नेह मिलन सोहळा सर्वांसाठी एक अविस्मरणीय व प्रेरणादायी क्षण ठरल्याचे प्रतिपादन सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक तथा राज्य पुरस्कार प्राप्त सेवा निवृत्त मुख्याध्यापक आचार्य ना.गो. थुटे यांनी या प्रसंगी केले.