नवीन शैक्षणिक धोरणाचा चिकित्सक अभ्यास करणे काळाची गरज … प्राचार्य मा. श्री. राजकुमार हिवारे 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.7 मार्च) :- येथे शिक्षण क्षमता वृद्धी प्रशिक्षण दिनांक 4 मार्च ते 6 मार्च 2024 ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन माननीय श्री. राजकुमार हिवारे प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. 

केंद्र शासनाने निर्माण केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण याचा प्रत्येक शिक्षक त्याचबरोबर पालक, विविध संस्था चालकांनी चिकित्सक अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून समजून घेऊन प्रत्यक्ष योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी शासन स्तरापासून ते प्रत्येक शाळेच्या स्तरावर होणे आवश्यक आहे. तेव्हाच विद्यार्थी परिपूर्ण घडेल असा विश्वास प्राचार्य हिवारे यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण जयश्रेया रिक्रेशन लॉन, चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षणात एकूण बारा घटकावर(प्रकरण) प्रकाश टाकण्यात आला.

 त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण, अभ्यासक्रम आराखडा व अंतर समावेश क्षेत्र, नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र, 21 व्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन, कुमारावस्थेतील मुले समजून घेताना, शाळा आधारित व क्षमता आधारित मूल्यमापन, राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण, संशोधन कार्यपद्धती कृती संशोधन व नवोपक्रम, माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रातील उपयोग ,भावी शैक्षणिक नेतृत्व यावर प्रत्येक दिवशी चार तासिका प्रमाणे तीन दिवसात एकूण बारा तासिका घेण्यात आल्या.

तज्ञ मार्गदर्शन म्हणून मा. श्री. खांडरे सर,मा.श्री. हेडाऊ सर,मा. गुज्जनवार मॅडम,मा. भौन्ड मॅडम,मा.श्री. पंधरे सर,मा.श्री. कोरडे सर,मा.श्री. नरेंद्र कन्नाके सर, मा. श्री. हिराजी कन्नाके सर यांनी अतिशय कल्पकतेने मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण मधे 15 तालुक्या मधून एकूण 112 शिक्षकांनी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झाले होते. सूत्र संचालन मा. पिंपळकर मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक श्री अमोल बल्लावर सर यांनी केले.

सर्व तज्ञ मार्गदर्शक यांना राजकुमार हिवारे प्राचार्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष श्री. रवींद्र तामगाडगे सर, श्री धनराज सर, श्री विवेक इतडवार सर सर्व डाईट टीम यांच्या सहकार्याने आयोजन अतिशय नियोजन सुंदर झाले. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.