वाघाच्या हल्ल्यात सफाई कामगार ठार

🔹निमढेला गेट वरील घटना 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.25 जानेवारी) :- जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या रामदेगी पर्यटन स्थळ चा मुख्य मार्गावरील आज सकाळी आठ वाजता वन विभागाच्या कार्यालयामध्ये रोजंदारी पद्धतीने सफाई कामगार म्हणून काम करीत असलेल्या निमढेला येतील सफाई कामगार परिसरातील सफाई करीत असताना अचानक वाघाने हल्लाबोल करून रामभाऊ हनवते राहणार निमढेला यांना जागीच ठार केले सदर ही घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. 

     सदर या संताजनक घटनेने परिसरातील बेंबळा निमढेला सर्व शेतकरी तसेच नागरिक भयभीत झाली असून नरभक्षक वाघाला तात्काळ जर बंद करण्यात यावे अशी मागणी संतापलेली जनता करीत आहे. शिवाय पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी यासोबत त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे.

तसेच सफारी करिता निमढेला गेट कायमचा बंद करण्यात यावा. अशा विविध मागण्या घेऊन नागरिक तसेच येथील भंते डॉक्टर धम्मचेती यांनी केली आहे.. या घटनेमुळे जंगल लगत असलेली शेती ही वारंवार धोक्यात येत असून या शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतीचे संरक्षण करावे लागत आहे करिता शेती संरक्षणाकरिता वनविभाग मार्फत शेतीसाठी तारेचे पक्के कुंपण करून देण्यात यावे अशी मागणी देखील येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

 तसेच रमदेगीच्य टेकडीवर विहाराच्या व रमदेगी परिसरात जर जाळीचे पक्के कुंपण बांधले तर होणारी जीवित हानी रोखू शकते . अन्यथा जीव गेल्यावर उपाय योजना करण्यात काय अर्थ… म्हणजेच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखी होईल . भंते डॉक्टर धममचेती.

       सदर ही घटना स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन ला मिळाली असता येथील ठाणेदार श्री शैलेंद्र ठाकरे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह जबर बंदोबस्त केला यात pai महादेव सरोदे ,भीमराव पडोळे, नितीन कूरेकर, प्रफुल कांबळे , अन्य पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली व पुढील तपास करीत आहेत. . तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन अधिक चौकशी करीत आहे..