टेंभुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र फोडण्याचा पाचव्यांदा प्रयत्न

🔹एकदा यशस्वी चारदा अयशस्वी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.10 डिसेंबर) :- वरोरा तालुक्यातील टेंभुर्णा येथील ग्रामपंचायत कार्यालयाला लागून बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे आठ डिसेंबरच्या रात्री ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील बाजू च्या भिंती ला अज्ञातचोरट्यांनी छिद्र पाडले व ग्रामपंचायतच्या कार्यालयात प्रवेश करून ग्रामपंचायत व बँकेच्या भिंतीला छिद्र पाडून बँकेत प्रवेश केला चोरट्यांच्या हालचालीने नागरिक सतर्क झाले नागरिक सतर्क होताच चोरट्यांनी पळ काढला सदर बँक चोरट्यांनी पाच दा फोडण्याचा प्रयत्न केला एकदा त्यांना यश आले.

आठ डिसेंबरच्या रात्री टेंभुर्डा ग्रामपंचायत कार्यालया च्या मागील बाजूस भिंतीला छिद्र पाडून आत प्रवेश केला त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातून बँकेच्या भिंतीस छिद्र पाडून बँकेत प्रवेश केला भिंत पाडण्याच्या आवाजाने काही नागरिक जागे झाले त्यांनी एकमेकांना भ्रमणध्वनी करणे सुरू केले नागरिक गोळा होत असल्याची चाहूल चोरट्यांना लागल्याने भिंत फोडण्याचे साहित्य चपला व दुपट्टा जागेवरच टाकून चोरट्यांनी फवारा केला नागरिक जागे झाल्याने चोरट्यांना बँकेत काही मिळाले नाही घटनास्थळी रात्रीच वरोरा पोलीस दाखल झाले.

श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले स्वान पथक टेंभुर्डे वरून नागपूर दिशेने असणाऱ्या पेट्रोल पंप पूर्वी जाऊन दोनदा परत आले त्यामुळे चोरटे त्या ठिकाणाहून वाहनाने रवाना झाल्याचे मानले जात आहे चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील एलसीडी व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीसीआर सोबत घेऊन गेले वरोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.