वरोरा येथे सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.24 जानेवारी) :- उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या महान व्यक्तींच्या जयंती साठी उप जिल्हा रुग्णालयाचे सर्वच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम डॉ. खुजे यांनी दोन्ही फोटोच्या प्रतिमेचे माल्यार्पण केले.

या कार्यक्रमाला वंदना विनोद बरडे सह. अधिसेविका संगीता नकले, इंदिरा कोडापे, सरस्वती कापटे, गीतांजली ढोक, प्रियांका राय, गोविंद कुंभारे, ओमकार मडावी, तुमराम, निता गायकवाड, बंडू पेटकर हजर होते. दोन्ही महान व्यक्तीच्या कार्याला उजाळा देण्यात आला.