ग्रामपंचायत च्या हलगर्जीपणामुळे दररोज हजार लिटर पाणी वेस्टेज

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.15 डिसेंबर) :- येथून जवळच असलेल्या ताडोबा कोअर जंगल लगत अर्जुनी गावामध्ये वाँलद्वारे हजारो लिटर पाणी वाया जात असून या ठिकाणी जनजीवन मिशन अंतर्गत बांधकाम एक टाकी आहे.

त्याचप्रमाणे दुसरी टाकी असून दोन टाकी असून सुद्धा टाकीमध्ये पाणी न जाता वाँलच्या माध्यमातून हजारो लिटर पाणी खाली जात असल्याने याकडे अक्षरशः ग्रामपंचायत दुर्लक्ष असून उन्हाळ्यामध्ये भेडसावत असलेल्या पाणीटंचाईला गावकऱ्यांना सामोरे जावे हे मात्र खरे.