नरेन्द्र कन्नके यांचे सुयश :- मराठी विषयात नेट उत्तीर्न

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.21 जानेवारी) :- डिसेंबर 2023 ला यू. जी. सी. नेट परीक्षा घेण्यात आली होती. 19 जाने. 2024 ला लागलेल्या निकालात नरेन्द्र गुरुदास कन्नाके यांनी उत्तीर्ण होऊन प्राध्यापक पदा करीता पात्र ठरलेले आहेत. नेहरू विद्यालय शेगाव बूज येथे सहाय्यक शिक्षक असून त्यांना 2018 चा महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई येथे प्राप्त झाला आहे. शालेय अध्यापन करीत असताना विद्यार्थी प्रमाणे सतत अभ्यास करीत असतात. त्यांचे 4 विषयात एम.ए. झाले असून अर्थशास्त्र विषय गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पीएच. डी. सुरू आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या राज्यशास्त्र विषयाच्या समितीवर सदस्य म्हणून निवड सुध्दा झालेली आहे. 

       नेट परीक्षेत बदल सांगत असताना, सतत अभ्यास केला तर अशक्य असे काहीच नाही. फक्त जिद्द व चिकाटी,मेहनत करून सहज यश संपादन करता येतो. ऑनलाईन साधने उपलब्ध असल्यामुळे व दररोज अभ्यास केल्याने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करता आले. यू. ट्युब वर बरेच विषाया नुसार पेपर 1 व पेपर 2 ची प्रश्नावली उपलब्ध आहे. याचे योग्य नियोजन केले तर बाकी विद्यार्थी सुध्दा यश संपादन करू शकतात.

या यशा बदल नीरजा समूह म.राज्य, माझे आई बाबा तसेच पत्नी सौ. नंदिनी कन्नाके, मुलगी कु. जान्हवी, नीरजा, भाऊ डॉ. हेमचंद कन्नाके, डॉ. शीतल कन्नाके,डॉ. राधिका कन्नाके, डॉ. दामिनी कन्नाके, पल्लवी कोडापे, प्रणय कोडापे, सर्व कन्नाके परिवार तसेच शिक्षक व मित्र परिवार कडून नरेन्द्र कन्नाके सरांचे अभिनंदन केले आहे.