माढेळी गावांमध्ये श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज या चौकाचे उद्घाटन करून नवीन नामकरण व नामफलक सोहळा उत्साहात

✒️होमेश वरभे माढेळी (madheli प्रतिनिधी)

माढेळी (दि.10 फेब्रुवारी) :- वरोरा तालुक्यातील माढेळी या गावामध्ये दि.8 फेब्रुवारी 2024रोज गुरुवारला माढेळी या गावामध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये श्री संत शिरोमणी जगणारे महाराज यांच्या नवीन चौकाचे नामकरण होऊन श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चौक असे नामफलक देण्यात येऊन नामफलक सोहळा उत्साहात पार पडला.

यापूर्वी या चौकाचे नांव आत्महत्या चौक असे खूपच चुकीचे नांव प्रसिद्ध झाले होते ही बाब लक्षात घेऊन तेली समाज बांधवांनी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांनासोबत घेऊन आपले गाव हे प्रसिद्ध बाजारपेठ केंद्र असून हे चुकीचे नावाने आत्महत्या चौक ओळखले जाते. परंतु हे नांव न देता श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या नावाने चौकाला ओळख व्हावी त्याकरिता तसे निवेदन पत्र ग्रामपंचायत कार्यालयला देऊन योग्य कार्यक्रमाचे नियोजन करून कमेटी व पदाधिकारी प्रमुख उद्घाटक म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच श्री देवानंदजी महाजन, ह.भ.प रामचंद्रजी काळपांडे महाराज, ह.भ.प चांभारे महाराज यांनी संताचे विचारायचे मार्ग मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाशजी मुथा. माजी जि. प बांधकाम सभापती, श्री विशालजी बदखल माजी कृ.उ.बा समिती वरोरा, श्री राजू पाटील डाफ माजी उपसरपंच, भीमाजी वाटकर माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राहुलभाऊ देवतळे सोसायटी अध्यक्ष वनिताताई हुलके उपसरपंच, सुनिताताई भडगरे ग्रा. प सदस्य, वंदनाताई येरचे ग्रा.प सदस्य स्वप्निल वाळके ग्रा.प सदस्य अमोलभाऊ कटकर ग्रा.प सदस्य महेश देवतळे ग्रा.प सदस्य रामाजी रेवतकर,राहुल वाघ, बालू ढेगळे, देवरावजी देवतळे,संदीप रेवतकर, कैलास हुलके, होमेश वरभे,विक्रम चंदनखेडे, तसेच कर्तव्यदक्ष मेजर श्री नंदकिशोर खनके (पोलीस )हे सुद्धा उपस्थित होते.

उत्कृष्ट पेंटिंग कलाकार श्री रमेश अवस्थि यांनी नामफलकाची उत्कृष्ट पेंटिंग करून नामफलकाला बनवले त्यामुळे त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येऊन. महाप्रसादाचा कार्यक्रमाने श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज असे चौकाचे नामफलक अनावरण करण्यात आले तरी या कार्यक्रमाला माढेळी येथील समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन चौकाचे नामकरण करण्यात आले.