वरोरा तालुक्यातील खराब रस्त्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक अभिजीत कुडे यांच्या 2 वर्षाच्या संघर्षाला यश  Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) aggressor for bad road in warora taluka Success to Abhijit Kude’s 2 year struggle

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.21 जुलै) :- वरोरा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती वरोरा यांना निवेदन. महाडोळी ते महाडोळी पाटी, चिकणी ते शेगाव पाटी, नागरी ते माढेली, उखर्डा ते नागरी, गिरसावडी ते माढेडी, गौड-शेगाव या चारही रस्त्याबाबत निवेदन दिले असता उपविभागीय अभियंता श्री झाडे साहेब यांनी सांगितले की महाडोळी ते महाडोळी पाटी रस्ता 50 लाख मंजूर आहे उखर्डा ते नागरी रस्ता दुरुस्ती 80 लाख मंजूर आहे या 2 रस्त्यासाठी अभिजित कुडे 2 वर्षापासून संघर्ष करत आहे, विविध अभिनव आंदोलन करून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.

21 निवेदन दिले 11 आंदोलन केले तेव्हा रस्त्याचे काम मंजूर झाले. लोकानी अभिजित यांचे आभार व्यक्त केले तरी काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी केली आहे. रस्त्यातील खड्डय़ात झाडे लावा आंदोलन, स्विमिंग आंदोलन, निषेध आंदोलन, भजन आंदोलन, दिवाळीत दिवे लावले, खड्डय़ात झोपून झोपा काढा आंदोलन अश्या प्रकारे अभिजित कुडे ने प्रशासनाला पडो की सडो करून सोडले होते. अखेर अभिजित यांच्या संघर्षाला यश आले आहे. 

मंजुरी असताना सुद्धा खूप विलंब होत असल्याकारणाने नागरिक त्रस्त झालेले आहे. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना कार्यपद्धती ने आंदोलन करण्यात येईल. 

त्यामुळे मंजूर काम ताबडतोब सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या आधी 2 वर्षापासून अनेक आंदोलन करून प्रशासन जाग करण्याच प्रयत्न केला तरी आता निवेदन नाही तर सरळ जनआंदोलन करू असा इशारा दिला. अभिनव आंदोलन करण्यात आले, खड्डय़ात झोपलो, झाडे लावा आंदोलन, दिवाळीत दिवे लावले, भजन केले, स्विमिंग केली, झोपा काढा आंदोलन केले .

तसेच चिकणी ते शेगाव पाटी दुरुस्ती एक कोटी २० लाख रुपयाची मागणी असून वरिष्ठ अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे ,सदर रस्त्याच्या मागणीसाठी निवेदन दिले, आंदोलन केले इतका संघर्ष केल्या त्या नंतर काम मंजूर झाले तरी देखील लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. 3 वर्षापासून लोकांना त्रासदायक झालेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे तरी तात्काळ दुरुस्ती करावी व कामाला सुरुवात करावी अन्यथा याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील .

गीरसावळी ते माढेली, गौळ ते शेगाव अत्यंत खराब रस्ता झाला असून संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे, या परिसरातील जनतेची ज्वलंत मागणी असून तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मार्गी लावावी, अन्यथा शिवसेनेचे जन आंदोलन आक्रमकपणे सुरू होईल अशी तंबी शिवसेना तालुकाप्रमुख दत्ताभाऊ बोरकर यांनी दिली.

यावेळी सौ नर्मदाताई बोरेकर शिवसेना महिला जिल्हा संघटिका, प्रतिभा मांडवकर युवती जिल्हा अधिकारी तथा सरपंच महाडोली सौ.सरला मालोकर महिला तालुका संघटिका,वरोरा अभिजीत कुडे युवासेना निखिल मांडवकर विद्याताई खाडे सरपंच दादापुर व महिला पुरुष शिवसैनिक उपस्थित होते….