तिरवांजा (मो) येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 55 पुण्यतिथी साजरी

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.21 जानेवारी) :- तालुक्यातील तिरुवांजा(मो) या गावांमध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक 20 व 21 जानेवारी 2024 संत तुकडोजी महाराज सभागृह तिरवंजा (मो) येथे पार पडला असून मार्गदर्शनावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रवींद्र शिंदे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), माजी अध्यक्ष श्री चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास शिंदे मेमोरेबल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट र.न.ई.635 जिल्हा चंद्रपूर, भास्कर पाटील ताजने उपजिल्हाप्रमुख शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) तथा सभापती भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती, बाळासाहेब पडवे, व्यंकटेश रेड्डी कावेरी कंपनीचे व्यवस्थापक, प्रशांत कोपूला उपसरपंच ग्रामपंचायत तिरवंजा भगवान उरकुडे,सितारामजी थेरे, शिवा कोरेवार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन पर भाषणात वंदनीय ब्रह्मलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजनाच्या मार्गातून आणि ग्रामगीताच्या मार्गातून सांगितलेले संपूर्ण कार्य हे सदैव गुरुदेव सेवा मंडळ व गावातील कार्यकर्त्यांनी शहरी भागातील कार्यकर्त्यांनी गाव घडवावे देश घडवावा व येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक म्हणून सतत हे कार्य सुरू ठेवावे. त्याचप्रमाणे स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरीबल रवींद्र शिंदे चारिटेबल ट्रस्टच्या 

 अंतर्गत येणाऱ्या *श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, वैदेही सद्गुरू संत जगन्नाथ महाराज प्रबोधन व जनजागृती अभियान, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना मदत योजना मदत योजना, वंदनीय हिंदुहंदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना व कै.म.ना. पावडे, क्रीडांगण योजनांची माहिती देण्यात आली. व इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

     सदर नियोजित कार्यक्रमानुसार दिनांक 20 जानेवारी 2024 शनिवारला पहाटे 5 ते 6 वाजता वंदनीय राष्ट्रसंताचे पुतळ्याचे अभ्यंगस्नान व पूजा गावकरीमंडळीच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 6 ते 7 वाजता ग्रामसफाई व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दुपारी 12 ते 2:00 वाजता ह. म. प. मारुती सावं व संच यांचा तुकडोजी महाराजांवर आधारित भजन व कव्वाली कार्यक्रम पार पडला. सायंकाळी चार ते सहा वाजता महिलांचा हळदी कुंकू व मार्गदर्शन पार पाडले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर्सोअभिलेषा ताई गवतुरे, अलकाताई ठाकरे, अश्विनीताई ताजणे माजी पंचायत समिती सदस्य भद्रावती ल, अर्चनाताई साप सरपंच, वैशालीताई वडेट्टीवार मॅडम, घोडे मॅडम

 मुख्याध्यापिका,सरिताताई काळे,सौ मनीषा येरगुडे सौ कुसुम कुळमेथे, सौ संगीता पिंगे, सो सॉरी डाहुले, सॊ.सोनाबाई चौधरी, सुलोचना सुमटकर, सविता पिंपळकर यांचे उपस्थितीत पार पडला.

 सायंकाळी 6:00 वाजता घटस्थापना व प्रार्थना श्री बाळासाहेब पडवे, महादेवराव ताजने गुरुजी, यशवंत येरगुडे,महादेव बोबडे, सिताराम थेरे, नथुजी पिंपळकर,दिलीप पिंगे, आदिनाथ झाडे,बाबुराव पाटील काळे,श्रीहरी राजुरकर, गणपत कारेकर,रमेश देवतळे रमेश हिंगोणे, अमित वानखेडे, सदानंद गोरकार,राजू डाऊले, छत्रपती एकरे, नानाजी पाटील बोबडे, नारायण बुरटकर गजानन झाडे,आनंदराव कारेकर, कंठिराम ठाकरे,बंडू सुमटकर, संजय देवतळे उत्तम खारकर, अवघड ग्राम सेवक, संजय वाघाड,युनूस माथु, खुर्शीद शेख ळ,गुलाब बोबडे,भुरे सर शिक्षक यांच्या उपस्थित पार पडला असून सायंकाळी 8 वाजता दर्शन पर कार्यक्रम पार पडला. तसेच रात्री 9 वाजता मूर्ती दाते श्री भूपेंद्रजी वांढरे, पालखी दाते श्री बबनरावजी काकडे नांदगाव यांचे उपस्थित जाहीर कीर्तन व समाज प्रबोधन कीर्तनकार हं. म. प. पंकज पाल महाराज व संच सप्त खंजिरी वादक याचा कार्यक्रम तिपुस्कर व अनिल कोरडे यांच्यातर्फे पार पडला.

 दिनांक 21 जानेवारी 2024 ला रोज सकाळी 4 ते 8 प्रार्थना ग्रामसफाई व सकाळी 8 ते 12:00 वाजता रामधुन व शोभायात्रा निघाली असून यामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचे एकूण 70 भजन मंडळींनी भाग घेतला.

दुपारी.1 ते 4 च्या दरम्यान काल्याचे किर्तन हं. म. प. जयश्रीताई गावतुरे मुक्काम पोस्ट हळदी तहसील मूल, ह. म. पं. सुरपान महाराज देवतळे महाराज व व पेटी वादक जितेंद्र परचाके तब्बल जी नामदेव वैद्य पेटी वादक व सात संगत यांच्या माध्यमातून पार पडून समस्त कार्यक्रमात संपूर्ण गावकरी मंडळी व सर्व गुरुदेव भक्त उपस्थित उपस्थित असून क्रमाचे संचालन पाटील सर यांनी केले. सायंकाळी संपूर्ण मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.