पारोधी नदिघाटातून रेतीची सर्रास चोरी… अखेर आशीर्वाद कुणाचा..

✒️वरोरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वरोरा(दि.8डिसेंबर):-स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पारोधि नदी रेती घाटावरून सर्रास पने दिन दहाडे रेतीची चोरी होत असून या कडे संबधीत विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे अखेर या रेती चोरट्याला कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे….

विशेष म्हणजे या नदीतील रेती घाटाचा लिलाव झाला नसून या रेतीवर अनेक रेती चोरट्यांची करडी नजर असून शासना च्या डोळ्यात धूळ झोकून लाखो रुपयांचा चुना लावून रेती ची तस्करी चोरी करून बेभाव विक्री करून लाखो रुपये कमाविण्याच्या मार्गात लागले आहेत.तर या रेती घाटावर ये जा करण्याकरिता भोंगळे नामक यांच्या शेतातून रेती भरलेले ट्रॅक्टर जात असतात त्यामुळे शेत पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे..

तरी देखील हे रेती चोरटे बळ जबरी करून शेतीतून ट्रॅक्टर नेत असतात. यांच्या उधट वागण्यामुळे अनेक नागरिक त्रस्त असून यांच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत… या रेती चोरटयावर वन विभाग चे अधिकारी यांचा आशीर्वाद असून हे यांना पाठबळ देत असतात असे नागरिक सांगतात.

तेव्हा संबधीत विभाग , महसूल विभाग , पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी याची खात्री करून यांच्यावर कठोर कारवाई करून रेती तस्करीवर आळा घालावा . याच सोबत रेती उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालक यांना पाठबळ देऊन यांच्या कडून मासिक पैसे वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहे..

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!