अदानी फाउंडेशन चांदा सिमेंट वर्क्स अंतर्गत पशु तपासणी शिबिर संपन्न

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.20 जानेवारी) :- तालुक्यातील मौजा शेणगांव, उसगांव ,घुघूस व धानोरा येथे अदानी फाउंडेशन (चांदा सिमेंट वर्क्स) अंतर्गत व पशु वैद्यकीय दवाखाना पांढरकवडा तसेच पशु वैद्यकीय दवाखाना-घुगुस यांच्या सहकार्याने *पशु तपासणी शिबिर* आयोजीत करण्यात आले.

 या पशु तपासणी शिबिरामध्ये चार गावातील एकूण ११६० जनावरांची तपासणी, लसीकरण करण्यात आले.

अदानी फाउंडेशनच्या विशेष पशु तपासणी शिबिरामुळे गावातील शेतकरी बांधवा मध्ये उत्साह चे वातावरण निर्माण दिसून आले.

या शिबिराच्या यशस्वी करीता बाएफ संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री गुरूदास गिरी, श्री सुरज देवगडे ( कृत्रीम रेतन तंत्रज्ञ बायफ), डॉ. बंसोड साहेब ( पशु वैद्यकीय अधिकारी-पांढरकवडा), डॉ. उईके साहेब ( पशु वैद्यकीय अधिकार-घुगुस), डॉ. रामटेके साहेब(विस्तार अधिकारी चंद्रपूर), श्री गणेश डोरलीकर ,संतोष झाडे (अदानी फाउंडेशन स्वयंसेवक), ग्राम पंचायत चे सरपंच तथा सदस्य व पशुपालक यांनी सहकार्य केले.