अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या ४ जानेवारीला आयोजित राज्यस्तरीय खुले पत्रकारांच्या अधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्यातून असंख्य पत्रकार रवाना

🔸चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी दाखवली हिरवी झेंडी

🔹सर्वच क्षेत्रातील संघाच्या पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .4 जानेवारी) :- जिल्ह्यातून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जामोद येथील राज्यस्तरीय खुले पत्रकार संघाच्या अधिवेशनात उद्घाटन म्हणून विद्यमान आमदार व माजी मंत्री डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारत सरकार केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव राहणार आहेत . यावेळी विद्यमान आमदार अँड. आकाश फुंडकर, दै .लोकमत सहयोगी संपादक मुंबई, ज्येष्ठ पत्रकार तथा अधिसिवकृती समिती अध्यक्ष यदु जोशी मंत्रालय मुंबई यावेळी उपस्थिती असेल.

आय. एन. एस .समितीचे कार्यकारी सदस्य विलासराव मराठे, ज्येष्ठ संपादक जयराम आहुजा, काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ.स्वाती वाकेकर, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटील, शाहू परिवाराचे अँड संदीप शेळके, ज्येष्ठ संपादक श्रीकृष्ण चांडक, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, रवींद्र लोखंडे, सुरेंद्रकुमार आकोडे, गोपाल हरणे ज्येष्ठ पत्रकार यावेळी उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनात

 चंद्रपूर जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून असंख्य पत्रकारांनी सहभाग दर्शविला असून ३ जानेवारी २०२४ ला सकाळी १० वाजता महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या मार्गदर्शनात शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथून जळगाव जामोद येथे राज्यस्तरीय अधिवेशनाला रवाना होण्याकरता निघालेल्या ट्रॅव्हल्स गाडीला चंद्रपूर चे लोकप्रिय विद्यमान आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी सामाजिक भान राखत इलेक्ट्रॉनिक्स प्रिंट वाहिनी माध्यमातून काम करणाऱ्या ग्रामीण शहरी व जिल्हा सहभागी पत्रकारांना शुभेच्छा देण्याकरता शासकीय विश्रामगृहात जातीने हजर राहून सदिच्छा भेट देत आयोजित अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी होणाऱ्या पत्रकारांसहित चंद्रपूर जिल्ह्यातून निघालेल्या सर्वच पत्रकारांना पुढील प्रवासाकरता हिरवी झेंडी दाखवली.

याप्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक , चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष किशोर पत्तीवार, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पारखी, सुरज गोरंतवार जिल्हा मार्गदर्शक, धर्मेंद्र शेरकुरे गणेश नालमवार तालुका प्रसिद्ध प्रमुख, मनोज गाठले तालुका उपाध्यक्ष वरोरा, मोरेश्वर उघोजवार सावली अध्यक्ष, खोमदेव तुम्हेवार सावली, शंकर तळस कोरपणा, जगदीश पेंदाम वरोरा, हबीब शेख तालुकाध्यक्ष कोरपणा, निखिल धोंडरे, समीर आसुटकर, विनोद शर्मा, बबन गोरंतवार आदींचा सहभाग असून चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ६५पत्रकार विविध माध्यमाने रवाना होत आहे. चंद्रपूर येथून रवाना होणाऱ्या सर्व क्षेत्रातील पत्रकार बांधवांना आवर्जून शुभेच्छा देण्याकरता इलेक्ट्रॉनिक्स वाहिनी ,प्रिंट छायाचित्र माध्यमातील प्रतिनिधी देवानंद साखरकर, श्याम हेडाऊ, गौरव पराते, धनंजय साखरकर, सुनील बोकडे आधी इतर सर्व समावेशक पत्रकार संघातील प्रतिनिधींनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली.