चारगाव बु. येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सहात साजरी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.4 जानेवारी) :- विद्येची देवता माता सावित्री बाई तसेच महिलांना शिक्षणाचा हक्क आधार प्राप्त करून देणाऱ्या माता सावित्री बाई फुले यांची जयंती चारगाव बू येथील माळी समाज यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच मोठ्या आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली . या जयंतीचे औचित्य साधून येथील सावित्रीच्या लेकीने आपले मनोगत व्यक्त करून इतर महिलांना जागृत करण्याचे मोठे सहकार्य केले याच सोबत अनेक महिलांनी सावित्री फुले यांच्या जीवनावर भाषण केले तर काहींनी नृत्य सादर केले. व नागरिकांचे मने जिंकली.

       भारतीय स्त्री ही शेकडो वर्ष शिक्षण व सामाजिक हक्कापासून वंचित होती. अनेक सामाजिक कथोकल्पित रूढी परंपरेच्या जंजाळात पूर्णतः जखडलेली होती. त्यांची फक्त ” चूल आणि मूल ” इथपर्यंत त्यांचं आयुष्य समाजानं सिमित केलं होतं. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांची अवहेलना पदोपदी पहावयास मिळत असे. त्यामुळे त्यांचं सारं आयुष्य पूर्णपणे अंधारमय झालं होतं. या साऱ्या प्रश्नांची मूळ कारणे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबांना अस्वस्थ करत होती. स्त्रीच्या मनातील वेदनेचा हुंकार अचूक ओळखून परिवर्तनासाठी अनेक संकटांना न जुमंता शिक्षणाच्या नंदा दीपातून समाज मन प्रज्वलित करण्यासाठी त्यांनी सावित्रीमाईला सुशिक्षित केलं.

 अन एका दैदिप्यमान उज्वलशाली पर्वाची पहाट उदयास आली. अतिशय खडतर, कठीण मार्गातून कणखर व संयमी मनाने स्त्री बलशाली झाली पाहिजे या ध्यासातून त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्ना पुढे समाज कंटकाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले व शिक्षणाची दालने स्त्रियांसाठी खुली करून आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. यात महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास साऱ्या विश्वाला सदोदित प्रेरणादायी आहे. 

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजू डोंगरे माळी समाज अध्यक्ष वरोरा, कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक तायडे सर, बनकर साहेब ,संदीप भाऊ सोनेकर, योगेश वायदुळे (सरपंच) चारगाव बू ,तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष छगन जी अडकिने, पोलीस पाटील राजू थूल ,गुरुदेव सेवा मंडळ चे अध्यक्ष अविनाशजी डाहूले, काला कमिटीचे अध्यक्ष महेशजी शास्त्रकार ,नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक राणे सर ,रामटेके सर, मधुकरजी भलमे सामाजिक कार्यकर्ता.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच मान्यवरांचे भाषणे, कार्यक्रमाचे संचालन श्री विठ्ठलजी तुरणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण मांदाडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजसेवा मंडळ चारगाव बु.यांचे मोलाचे योगदान लाभले.