आज येन्सा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन A grand blood donation camp will be organized at Yensa today

✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.3 जुलै) :- तालुक्यातील येन्सा येथे दिवंगत खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान असून रक्तदान करण्याने कोणतीही कमजोरी येत नसून ती खरी मानवता आहे.

त्यामुळे परिसरातील जनतेने रक्तदान शिबिर केंद्रावर येऊन स्व इच्छेने रक्तदान करून दिवंगत खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त खरी आदरांजली वाहण्यात यावी असे आवाहन रक्तदान शिबिराचे आयोजक वरोरा तालुका काँग्रेस कमिटी, वरोरा तालुका विद्यार्थी काँग्रेस ( एन एस यु आय), वरोरा तालुका युवक काँग्रेस यांनी केले आहे.