✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बु (दि.14 एप्रिल) :-
एकीकडे टेलिकॉम क्षेत्रात 4 जी वरून 5 जी कडे प्रगती करत आहे. देश डिजिटल इंडिया कडे वाटचाल करत आहे. परंतु वरोरा तालुक्यातील शेगाव मध्ये मात्र या उलट परिस्थिती आहे.
तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेला या गावात जिओ चे हजारो ग्राहक आहे. पण मागील 2 महिन्या पासून त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम चा सामना करावा लागत आहे. 5 जी च्या जमान्यात मात्र शेगाव मधील ग्राहकांना 2 जी ची पण सेवा बरोबर मिळत नाही.
सोबतच फोन केला तर आवाज पण बरोबर येत नाही. त्या मुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. कंपनी ला वारंवार तक्रार करून पण त्याचा काहीही उपयोग होत नाही.
महिन्याला मात्र न चुकता रिचार्ज करावे लागते अंन्यथा सेवा बंद केली जाते पण, रिचार्ज करून सुविधा मिळत नसल्या मुळे ग्राहक असंतोष वक्त करत आहे. व लकरात लवकर जिओ कंपनी ने यावर उपाय योजना करून सेवा सुरू करावी अशी मागनि जिओ चे ग्राहक करत आहे...
