झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

59

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 फेब्रुवारी) :- ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव (खुर्द) येथील ५५ वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकिस आली आहे.

राजेश्वर तुकाराम दुपारे वय (५५ )वर्ष रा. तोरगाव खुर्द ता.ब्रम्हपुरी असे मृत इसमाचे नाव आहे.

 मृतक राजेश्वर दुपारे हा दिनांक २२ फेब्रुवारीला२०२४ रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान नागपूर येथे जातो. असे घरी सांगून स्वतःचे मोटार सायकलने घरून निघून गेला होता. त्या नंतर सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता शोध लागला नाही. २३ फेब्रुवारीला त्याची मोटार सायकल तोरगाव (बूज) ते मौशीकडे जाणाऱ्या रोडचे बाजूला सागवान नर्सरी जवळ दिसल्याने शोध घेतला असता मृतक हा सागाच्या झाडाचे फांदीला एका पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या परिस्थितीत आढळून आला.

 त्याच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून सदरचा मर्ग नोंद करून ब्रह्मपुरी पोलिसांकडून तपास करण्यात आला आहे.