चंदनखेडा येथे शिवछत्रपती महाराज जन्मोत्सव साजरा

✒️ मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती (दि.20 फेब्रुवारी) :- तालुक्यातील चंदनखेडा येथील क्रांतिसुर्य बिरसा मुंडा चौक चंदनखेडा येथे नुकताच १९ फेब्रुवारी २०२३ रविवार ला. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा युवकांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार मालाअपर्ण करून महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून युवकांनी महाराजांच्या जयघोष घेतला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर दोडके, दिलीप कुळसंगे,सुधाकर दोडके, शौर्य क्रिडा मंडळाचे शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, आशिष बारतीने, कुणाल ढोक, दिनेश दोडके,प्रज्वल बोढे, शंकर दडमल, निखिल दोडके, अनिकेत बुरेवार,पंकज दडमल, स्वप्निल दडमल, आशिष हनवते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.