भद्रावतीत संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान रॅली 

70

🔸संविधानावर वक्तृत्व स्पर्धा व संविधान प्रबोधन सभा

🔹विविध प्रमुख वक्ते व मार्गदर्शकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26 नोव्हेंबर) :- संविधान नागरिक संवर्धन समिती भद्रावती द्वारा २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विविध भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात संविधान सन्मान रॅली २६ नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजता पथनाट्य ,संविधान प्रबोधन देखावे, लेझीम पथक- बँड पथक, आदिवासी सांस्कृतिक पारंपरिक नृत्य समूह यासह नाविन्यपूर्ण वेशभूषेसह अनेक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्तरावरील कार्यरत सामाजिक सेवा संस्था आदी सहभागासह संविधान सन्मान रॅली (हुतात्मा स्मारक) जिल्हा परिषद हायस्कूल पासून निघणार असून ती थेट भद्रावती बाळासाहेब ठाकरे प्रवेशदार गेट मार्गक्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भद्रावती येथे रॅलीचा समारोप होईल.

संविधान सन्मान रॅलीला भद्रावती -वरोरा क्षेत्राच्या महिला विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर, तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार बिपिन इंगळे, मुख्याधिकारी विशाखा शेळखी, संवर्ग विकास अधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर ,वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिंग ,सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर संविधान सन्मान रॅलीला उद्घाटन पर झेंडी दाखवणार आहेत.

संविधान शाळा महाविद्यालयीन सहभागी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक समारोपिय रॅलीत बिस्किट व फळाचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी १.३०वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक जुना बस स्थानक येथील विचार मंचावर संविधान दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून वयोगट ८ ते १६ स्पर्धकांसाठी “माणुसकीचा सुरक्षा कवच आणि भारतीय संविधान”,

“भारतीय संविधान आणि भारतीय नागरिकांची जबाबदारी” सदर दोन विषय राहणार असून वेळेची मर्यादा पाच मिनिटाची निर्धारित करण्यात आली आहे . वयोगट १६वर्षावरील वक्तृत्व स्पर्धकांसाठी “भारताचे संविधानात धर्मनिरपेक्षतेचा उचीतार्थ”. “भारतीय संविधान व आजची राजकीय परिस्थिती”.

सदर दोन विषयावर वक्तृत्व स्पर्धा राहणार असून सहभागी स्पर्धकांसाठी वेळेची मर्यादा सात मिनिटांची राहील. सायंकाळी ६ वाजता भव्य संविधान प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील कोचिंग अकॅडमी संचालक अजय पाटील, तर सविधान समारंभाचे स्वागताध्यक्ष भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष राजरतन पेटकर, प्रसिद्ध वक्ते वक्ते व मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तुषार उमाळे, ब्रिटिश सरकारचे चेव्हिनिंग स्कॉलर अॅड. दीपक चटप, युवा वक्ते अनिकेत दुर्गे, राहणार आहे.

संविधान दिनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. भूपेंद्र रायपुरे संविधान अभ्यासक, कुशल मेश्राम वंचित बहुजन आ. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, शंकर मुन भीम आर्मी महाराष्ट्र महासचिव, सुरेंद्र रायपुरे भीम आर्मी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, सुरज गावंडे सामाजिक कार्यकर्ते भद्रावती, इंजि .प्रकाश पिंपळकर प्राचार्य माँ भवानी आयटीआय भद्रावती, विशाल बोरकर सामाजिक कार्यकर्ता, डॉ.अमित नगराळे सामाजिक कार्यकर्ता भद्रावती, रवींद्र तिराणिक जनमंच सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ.राहुल बिपटे, संदीप ढेंगळे सामाजिक कार्यकर्ता, डॉ. कार्तिक शिंदे सचिव निळकंठ राव शिंदे महाविद्यालय भद्रावती, सुशील देवगडे मा.नगरसेवक भद्रावती, मार्शल सुनील मेश्राम, रत्नाकर साठे, नंदू पठाल मा. नगरसेवक भद्रावती, शाहिस्ता खान पठाण हु.वे.म. असो.अध्यक्ष महिला भद्रावती, महेंद्र गावंडे सामाजिक कार्यकर्ता, मिलिंद वाघमारे प्राचार्य डॉक्टर आंबेडकर मेमोरियल स्कूल भद्रावती, मनोज मोडक लॉर्ड बुद्धा टीव्ही प्रतिनिधी भद्रावती, नितेश बानोत ऑल रीलिजयन फाउंडेशन भद्रावती, वैभव जुमडे सामाजिक कार्यकर्ता भद्रावती प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शाळा महाविद्यालयीन गुणवत्ता क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त तथा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार- बक्षीस वितरण होईल.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संविधान नागरिक संवर्धन समिती तर्फे राजरतन पेटकर, अनिकेत रायपुरे, प्रणय कांबळे, बादल बाराहाते, थॉमस दुधे, संकेत चिमूरकर, सचिन नारायणे, विकास दुर्योधन, सोनू सिंग ,पनवेल शेंडे, सुमित हस्तक, कुलीन शेंडे, फैयाज शेख, सोनू बानागिरी, इंजि.जगदीश लवाडिया, सिद्धार्थ पेटकर, वैभव पाटील, मारुती जांभुळे, कल्पना देवगडे, सुनिता खंडाळकर, विभा बेहरे, सोनू चौधरी, रेणुका साने, मानसी देव आदि संयोजन कमिटीचे कार्यकारी प्रतिनिधी अथक परिश्रम घेत आहेत.