नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज येथे संविधान दिन साजरा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.27 नोव्हेंबर) :- नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनीयमीत करुन देशाला अर्पित करण्यात आले. त्यानंतर तो दिन तेव्हापासुन संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा,संविधान प्रास्ताविकाचे वाचन व प्रभात फेरीचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मुख्याध्यापक ढाकुणकर, जेष्ठ शिक्षक चांगले, मानकर, शिक्षीका हिवरकर, हटवार तथा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.