SBI सावरी शाखेतर्फे पंतप्रधान जिवन ज्योती व सुरक्षा विमा योजनेचा धनादेश वाटप

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.19 नोव्हेंबर) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया सावरी येथील शाखेतर्फे पंतप्रधान जिवन ज्योती व सुरक्षा विमा योजनेच्या लाभार्थ्यांना दोन लाख रुपयाचा धनादेश शाखेचे व्यवस्थापक श्री धम्मपाल नरवाडे यांच्या हस्ते पीडित कुटुंबाला प्रदान करण्यात आला.. 

        सविस्तर असे की SBI सावरी शाखेतर्फे ग्राहकांच्या सेवेसाठी पंतप्रधान जिवन ज्योती व सुरक्षा विमा योजना राबविण्यात आली. या योजने अंतर्गत 330रू. व 12 रू. भरून ग्राहकांनी विमा उतरविला होता. सदर या योजनेचे लाभार्थि राजेश बारेकर रा. बोथली यांनी देखील या योजनेतून विमा उतरविला होता. दरम्यान राजेश बारेकर यांचा प्रावस दरम्यान उमरेड मार्गावर अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला.

याची माहिती शाखा व्यवस्थापक श्री धम्मपाल नरवाडे व कर्मचारी श्री सुशील नन्नवरे यांनी पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांचे सांत्वन केले व योजनेच्या लाभा करिता लागणाऱ्या सर्व कागद पत्राची पूर्तता केली व वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा करून या योजनेचा लाभ पीडित कुटुंबाला प्राप्त करून दिला. व मृतक राजेश ची पत्नी मोनाली बारेकर व त्याची आई बेबीताई बारेकर यांना दोन लाख रुपयाचा धनादेश स्वाधीन करण्यात आला.. 

        केंद्र सरकारच्या पंतप्रधान जिवन ज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनेचा लाभ सर्व खातेदारांनी घ्यावा असे आवाहन शाखेचे व्यवस्थापक श्री धम्मपाल नरवाडे व कर्मचारी सुशील नन्नवरे यांनी केले आहे.