भद्रावतीत दि. २२ एप्रिल रोजी संतश्रेष्ठ श्रीच्या पादुकांचा दर्शन सोहळा व महाप्रसाद वितरण Bhadravati dt.on April 22,darshan ceremony and mahaprasad distribution of sant shrestha’s feet

257

🔸स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचा उपक्रम

✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.15 एप्रिल) : –

         स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या विद्यमाने भारतीय संस्कृती मधील साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया सणाच्या औचित्यावर  दि. २२ एप्रिल रोज शनिवारला दुपारी चार वाजता स्थानिक श्री मंगल कार्यालय मेन रोड येथे संतश्रेष्ठ श्रीच्या पादुकांचा दर्शन सोहळा व महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

    यानिमित्याने भाविक बंधू -भागिनिंना अखंड महाराष्ट्राचे दैवत संतश्रेष्ठ श्रीरामदास स्वामी महाराज, संतश्रेष्ठ स्वामी समर्थ महाराज, संतश्रेष्ठ गजानन महाराज, संतश्रेष्ठ साईनाथ महाराज  आणि संतश्रेष्ठ श्री जगन्नाथ महाराज यांच्या प्रत्यक्ष पादुकांचे दर्शन घेता येईल.     

          दि. २२ एप्रिल रोज शनिवार रोजी दुपारी दिड वाजता रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांच्या निवासस्थानी श्रीच्या पादुकांचे भव्य आगमन होईल. याच दिवशी दुपारी चार वाजता स्थानीक श्री मंगल कार्यालय मेन रोड येथे संतश्रेष्ठ श्रीच्या पादुकांचा दर्शन सोहळा व महाप्रसाद वितरण करण्यात येईल.

या कार्यक्रमात भाविक बंधू -भागिनिंनी फार मोठया संख्येत सहभागी व्हावे. असे आवाहन स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष तथा (  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख 

 रविंद्र शिंदे आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी संयुक्तपणे केले आहे.