महावितरण चा भोंगळ कारभार Poor management of Mahavitran

257

🔸 एक महिन्या पासून शेतात पडलेले पोल शेतकऱ्यांनी सांगून सुद्धा अधिकारी करत आहे दुर्लक्ष(The authorities are ignoring even the farmers telling about the poles lying in the field since one month)

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.6 जून) :- तालुक्यातील नागरी शेतशिवारात जवळपास एक महिन्यापासून शेतातील लाईन चे पोल शेतात पडलेले आहे.

शेतकऱ्यांनी ह्या प्रकरणाची माहित संबंधित अधिकारी यांना देऊन जवळपास एक महिन्याच्या कालावधी लोटला तरी अजून सुद्धा महावितरण च्या अधिकाऱ्यांना जाग आला नाही.

शेतकऱ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना फोन वर स्वतः भेटून माहित देत असताना तळवा तळवीचे उत्तर मुजोर अधिकारी देत होते. आज प्रहार सेवक गणेश उराडे यांना फोन द्वारे संपर्क साधून संपूर्ण प्रकरण सांगताच त्यांनी दूरध्वनी द्वारे अधिकाऱ्यांना खडसावून पोल उभे करून लाईन चालू करण्यास सांगितले आधिकाऱ्यांनी आजच आम्ही आमचे कर्मचारी पाठवून लाईन चालू करू असे आश्वसणं दिले.