कायद्यापूढे सर्व समान …अँड. प्रशांत कुलकर्णी

✒️सुनील भोसले नाशिक(Nashik प्रतिनिधी)

नाशिक(दि.9 नोव्हेंबर) :- दि. 8 नोव्हे. 23 रोजी दिला आपल्या पक्षकाराला न्याय. म्हटल्या जाते की स्त्री व पुरूष तुलनेत फक्त पुरूष सोबत अन्याय होतो परंतु ही संकल्पना खरी नाही तर जसा स्त्रीला न्यायव्यवस्थेत अधिकार आहे तसा पुरूषला पण आहे हे सिद्ध करून दाखविण्याची कुवत आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने व कायद्याच्या जोरावार मलकापूर ज़ि. बूलड़ाना येथुन ते मालेगांव नाशिक येथे जाऊंन विविध लागलेल्या भा.द.वी कलम योग्य कायद्यात बसवुन त्यानी आपल्या पक्षकारास योग्य न्याय दिला. तसेच पक्षकार हा त्यांचा बालपनीचा जीवलग मित्र होता तो मित्र उच्च सुशिक्षित आहे व गरीबीतुन पूढे जात आहे त्याच नुक़सान होऊ नये म्हणुन एकुन 600 km प्रवास करून कमीत कमी दिवसात त्यानी पक्षकारची खरी बाजू मांडून मित्राला न्याय दिला. 

तसेच स्वता: पैसे खर्च करुन मित्राला हिमंत देऊन आज निर्दोष मुक्त केले. यावरून असे दिसुन येते की त्यानी फक्त आपला वकीली पेशा हा जोपसाला नसुन खरी मैत्री भावनाही कायम ठेवली. खरच अश्या ग्रेट व्यक्ती चे सर्वत्र कौतुक होत आहे.