माझी पिल्लू तू …माझी जान आहे.. अल्बम सॉंग लवकरचं तरुणांईच्या भेटीला

✒️पांडुरंग गोरे पुणे(Pune विशेष प्रतिनिधी) 

पुणे(दि .9 नोव्हेंबर) :-  आशिष खांडवीकर व सोनाली खरमारे यांचे अल्बम माझी पिल्लू तू …माझी जान आहे , हा लोकप्रिय अल्बम लवकरचं युट्युब वरती मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ,रोमँटिक व लव्ह सॉंग असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे , तरूण तरुणांईची पसंती मिळणार आहे, या व्हिडिओ अल्बम सॉंग चे चित्रीकरण संभाजीनगर व पुणे येथे विविध लोकेशन वरती करण्यात आले आहे , ग्रामीण व शहरी भागातील प्रेक्षकांची आवड ओळखून या अल्बम सॉंग ची निर्मिती करण्यात आली आहे.

कॉलेजातील तरुण, तरुणींना सामोरे ठेवून हे गीत साँग चित्रित केले आहे व ते तरुणांच्या मनाप्रमाणे झाले आहे व पसंती उतरणार आहे , या रोमँटिक सदाबहार साँगचे गीतकार आशिष खांडवीकर तर संगीतकार विकास साळवे तर या गीतेच्या रचनेला स्वरबंद प्रसिद्ध गायक आकाश हजगुंडे यांनी केले आहे, छायाकन भूषण मारबते व बालाजी खांडवीकर यांनी केले आहे.

दिग्दर्शन ची जबाबदारी सोनाली खरमारे यांचे आहे, या साँग ची प्रस्तुती बालाजी फिल्म प्रोडक्शन या नामवंत कंपनीने केली आहे, आशिष खांडवीकर व सोनाली खरमारे ही जोडी या या अल्बम साँग द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे , माझी पिल्लू ..तू माझी जान आहे.. या हटके टायटल सॉंग अल्बम चे लवकरचं धुमधडाक्यात लॉन्चिंग होणार आहे