में जश्न देशीबार दुकान बंद करा अन्यथा आंदोलन करु अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर 

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.16 मे) :- 

आज दि. 16 मे 2024 रोजी दिक्षा भुमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा घुग्घूस परिसरातील देशी दारू विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी सफेद झंडा कामगार संघटना अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन केली आहे. या में जश्न देशी दारू दुकानाला परवानगी देणारे नवबौद्ध स्मारक समिती तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुस यांनी दिली असुन . त्यांनी दिलेल्या परवानगी बाबत आम्ही मा. जिल्हाधिकारी साहेब यांना याबाबतीत जाब विचारण्यासाठी आज 16 मे 2024 निवेदन दिले आहे. की, प्रार्थनास्थळांजवळही अशा प्रकारे देशी दारू विक्रीचे दुकान उघडण्यासाठी परवानगी आहे का. तसेच आम्ही निवेदनाद्वारे राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर विभागाच्या संबंधित अधीक्षक साहेब यांना सुद्धा विचारतो की कायद्याने जर 300 मीटर अंतर सोडून दारू विक्रीचे दुकान उघडण्यासाठी नियम आहे तर आपण दिक्षा भुमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा घुग्घूस जवळ अंदाजे 15 मिटर च्या अंतरावर आपण परवानगी कशी काय दिली.

जर आपण ताबडतोब में जश्न देशीबार दारू विक्रीचे दुकान बंद करावे नाहीतर आम्हाला जिल्हा पातळीवर तीव्र भुमिका घेऊन आंदोलन करावे लागेल आपल्या अशा भोंगळ्या कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करतो. 

असा इशारा यावेळेस सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना यांनी दिला आहे.