जिद्द,चिकाटीने परिश्रम केल्यास यश निश्चितच मिळेल..रवींद्रसिह परदेशी ( sp ) चंद्रपूर 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.8 ऑक्टोबर) :- जिद्द,चिकाटीने परिश्रम केल्यास यश निश्चितच मिळतो.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना स्वतःची भूमिका प्रामाणिक पार पाडावी.स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मागे वळून पाहू नये.ध्येय,नियोजन,मेहनत,महत्वाकांक्षा आणि त्याग हा यशाचा मूलमंत्र जपा,असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्हा पोलीस दल व गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या वतीने संयुक्त सायबर सुरक्षा आणि कायदेविषयक जनजागृती व स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच गोंडपिपरी येथील कन्यका सभागृहात पार पडला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी बारावीत ४४ टक्के गुण मिळाले म्हणून खचून न जाता त्यांनी मेहनतीवर विश्वास ठेवला.त्याचवेळी अभ्यासात सातत्य ठेवत उपविभागीय अधिकारी पदापर्यंत शेवाळे यांना मजल मारता आल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला.दरम्यान प्रशासकीय काम असल्यास थेट कार्यालयात या,असे आवाहन देखील या अधिकाऱ्यांनी केले.

पोलीस महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे मत ठाणेदार जीवन राजगुरू यांनी व्यक्त केले.त्यानंतर मुजावर अली यांनी सायबर सेलबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी नायब तहसीलदार राजेश मडामे,स्व.ल.कु.कनिष्ठ महाविद्यालयाचे सचिव अजय माडुरवार,चिंतामणी काॅलेजचे प्रा.चव्हाण,प्रा.बामणकर,जनता विद्यालयाचे प्रा.नागापुरे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

‘एसपीं’ना सेल्फीचा मोह आवरला नाही 

पोंभूर्णा तालुक्यातील सोहमचा पोलीस अधीक्षक परदेशी यांच्याशी सवांद साधताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी त्यांच्यावर आकर्षक झाले.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानंतर परदेशी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी विनंती केली असता स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल घेऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.