24 तास सेवा ग्रुपच्या वतीने सत्कार

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.31 डिसेंबर):- नगरपरिषद वरोरा अंतर्गत येणाऱ्या भारत भूषण मालवीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विजया राऊत सेवानिवृत्त झाल्या त्यांचा एका कार्यक्रमात 24 तास सेवा ग्रुप च्या वतीने सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद वरोराचे प्रशासन अधिकारी दिलीप गीदे वार होते प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख राजू पीज दूर कर 24 तास सेवा ग्रुपचे अध्यक्ष लखन केशवानी माजी नगरसेवक सनी गुप्ता उपस्थित होते भारत भूषण मालवीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विजया दिनकर राऊत या सेवानिवृत्त झाल्या बाबत 24 तास सेवा ग्रुप च्या वतीने शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

 कार्यक्रमाचे संचालन ठमके यांनी तर उपस्थितांचे आभार बुट्टे यांनी मानले कार्यक्रमाला 24 तास सेवा ग्रुपचे प्रफुल्ल वनकर किरण लेंडे तेजस चौधरी अनिकेत मेश्राम बाळू जीवने प्रतीक्षा मेश्राम प्रतिभा कुंबरे व भारत भूषण मालवीय विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले