शेगाव येथे शेतकऱ्यासाठी हरभरा पिका विषयी शेतीशाळा 

✒️शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (16 फेब्रुवारी) :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग सन 2022-23अंतर्गत हरभरा पिकाची शेतकऱ्यांची शेतीशाळा शेगाव बु परीसरात दिनांक 15/ 02 /2023बुधवार ला हरीभाऊ गोपाळ चापले यांच्या शेतावर घेण्यात आली . शेतीशाळेला मार्गदर्शक मा श्री विजय काळे सर मंडल कृषी अधिकारी , मा श्री अगातेसर पशु वैद्यकीय अधिकारी वरोरा ,मा श्री भुते सर कृषी पर्यवेक्षक, यांनी मा श्री अरविंद झाडे सरपंच मा श्री मनोज बोदगुलवार, शेतीशालेला मार्गदर्शक हजर होते.मा सौ दुर्गे मॅडम कृषि सहायक यांच्या नेतृत्वात शेतीशाळा घेण्यात आली.

त्यांनी हरभरा पिकाची बीजप्रक्रिया, पटा पद्धतीने पेरणी करणे व त्यापासून होणारे फायदे,शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.तसेच कृषि विभागाच्या योजनाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली मा.भोयर सरांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडडळीचे नियंत्रण बाबत माहिती दिली . श्री विजय काळे सरांनी हरभरा बियाणाची बीजप्रक्रिया व सोबतच पटा पद्धतीने पेरणी चे प्रात्यक्षिक करून दाखविले.

कापूस ,धान, फडझाडे या पिकांचे मार्गदर्शक व पीक नियोजन याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि पशु संदर्भात माहिती देण्यात आली आणि योजनेबद्दल सांगण्यात आले. शेतीशालेला श्रीराम कृषी बचत गट शेगाव बु यातील सर्व सदस्य विठ्ठल चाफले, जयंता गजभे, श्रीधर नरड,हरिभाऊ चाफले, ईश्वर नरड,भारत नरड, केशव लोडे, भैया घडले, विनायक नरड,गौरव लुच्चे ,रोशन चापले, राजु चौवरे,तुळशीराम भुतकर ,प्रभाकर नरड, कार्तिक नरड , भूषण चाफले , गणपत नरड ,अमर नरड संदीप घोडफळे व महिला वर्ग इतर शेतकरी उपस्थित होते.