खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना पितृशोक Condolences to MP Balubhau Dhanorkar

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.27 मे) :- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर तथा भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज शनिवारी 27 मे रोजी सायंकाळी 5.30 नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. 

            आज भद्रावती येथील घुटकाळा वार्डातील निवासस्थानी सायंकाळी ८ ते उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिवदेह ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या रविवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 9 वाजता भद्रावती येथील जैन मंदिर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.