निःशुल्क टेस्ट सिरीज ही बेरोजगार तथा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना ठरेल लाभदायी : रविंद्र शिंदे Free test series will be beneficial for unemployed and youth preparing for competitive exams: Ravindra Shinde

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.9 जुलै) :- निःशुल्क टेस्ट सिरीज ही बेरोजगार तथा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना लाभदायी ठरेल, या टेस्ट सीरिजमुळे विद्यार्थ्याची प्रॅक्टीस होईल व राज्य तथा केंद्र शासनाच्या परीक्षेत यश गाठण्यास मदत होईल, असे उद्गार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी काढले. जेष्ठ शिवसैनिक रामभाऊ पेटकुले व दत्ता बोरेकर यांचे हस्ते निशुल्क टेस्ट सिरिजचे उद्घाटन करण्यात आले. 

         युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवतींकरीता तलाठी व वनरक्षक या पदाकरीता निःशुल्क टेस्ट सिरीज चे आयोजन वरोरा व भद्रावती या तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आले आहे. या निःशुल्क टेस्ट सिरीजचा पहिला टप्पा आज (दि.९) ला पार पडला. वरोरा येथे कर्मवीर विद्यालय व भद्रावती येथे डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय येथे प्रथम टेस्ट सिरीज पार पडली. जवळपास २५० विद्यार्थ्यांनी या टेस्ट सीरीजचा लाभ घेतला. प्रथम टप्प्यातील तलाठी टेस्ट सिरीजमध्ये प्रथम आशिष दुपारे, व्दितीय प्रज्ञा नेवारे, तृतीय मोहित मांढरे, अनुप खुटेमाटे तर वनरक्षक टेस्ट सिरीज मधे प्रथम कुशाल डोहे, व्दितीय संजिवनी बोंढे, प्रज्ञा नेवारे आले आहेत.

           वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेना व अस्पायर प्रोफेशनल अकॅडमी, चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने या निःशुल्क टेस्ट सिरीज उपक्रमाचे आयोजन सुरू आहे. महिन्यातील प्रत्येक रविवारी सदर निःशुल्क टेस्ट सिरीज होणार आहे.

        युवासेनाप्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे यांचे प्रेरणेने व युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुबंई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शितलताई देवरुखकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य, हर्षलजी काकडे, युवासेना विभागीय सचिव तथा गोडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेशजी बेलखेडे, पूर्व विदर्भ सघंटीका व प्रवक्ता सौ. शिल्पाताई बोडखे यांचे नेतृत्वात तसेच माजी संपर्क प्रमुख अजय स्वामी, जिल्हा सघंटीका (वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी) सौ. नर्मदाताई दत्ताभाऊ बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे व जिल्ह्यातील सर्व जेष्ठ (पुरुष,महीला) युवा-युवती पदाधिकारी यांचे मार्गदर्शनात युवा-युवती सेने तर्फे “तलाठी व वनरक्षक” पदाकरीता निःशुल्क टेस्ट सिरीज घेतल्या जात आहे. वरोरा-चिमुर-ब्रम्हपुरीच्या युवती जिल्हा अधिकारी कु. प्रतिभा माडंवकर यांनी या उपक्रमाचे प्रसारन केले आहे.

         यामध्ये चंद्रपुर जिल्हा व ईतर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनी भाग घेत आहेत. विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी प्रा. प्रीती पोहाणे, प्रा. आश्लेषा जीवतोडे, शिव गुडमल, तेजस्विनी चंदनखेडे, प्रणाली मडकाम, नेहा बनसोड, गौरव नागपुरे, सीमा लेडांगे, पुनम सरपाते, ज्योती पोयाम, स्नेहा किन्नाके, भावना खोब्रागडे, महेश निखाडे, मनोज पापडे, प्रज्वल जाणवे, सौरभ खापने, निखिल मांडवकर, राहूल मालेकर, गौरव नागपुरे यांचेकडे पुढील रविवारच्या टेस्ट सिरीज करीता संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          सदर उपक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व युवा-युवती सेनेच्या पदाधिकारी, सर्व शिवसैनिक, सघंटीका आदी परिश्रम घेत आहेत.

           प्रा. प्रीती पोहाणे, प्रतिभा मांडवकर, अभिजीत कुडे निखिल, मांडवकर, अनिल सिंग, शुभांगी डाखरे, स्वाती ठेंगणे, चंदू जीवतोडे, मंगेश भोयर, सृजन मांढरे, युवराज इंगळे, सूर्यवंशी सर, प्रा. निलेश शिरसागर , तेजस्विनी चंदनखेडे, ज्योती पोयाम उपस्थित होते.