खिदमत सोशल फाऊंडेशन च्या वतीने शनिवारी वरोरा येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन

76

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.6 ऑक्टोबर) :- जगाला मानव सेवा हीच श्रेष्ठ सेवा हा संदेश देणारे हजरत मोहम्मद सल्लल्लोहो अलेंही व सल्ला यांच्या जयंतीनिमित्त येथील खिदमत सोशल फाउंडेशन वरोरा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ऑक्टोबर रोज शनिवारला एका भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

         येथील नगर भवनात वरोरा चे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा भाजप सचिव अहेतेशाम अली यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते होत आहे. याप्रसंगी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे,नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर, भाजपचे विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास नेरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

                         सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात रक्तदाब, ब्लड शुगर, किडनीचे आजार, हृदयरोग, नेत्ररोग, आतड्याचे आजार, पोटाचे आजार, मणक्यातील गॅप, त्वचेचे विविध आजार इत्यादी रोगांचे निदान व त्यावर उपचार केले जाणार आहेत.

              या रोग निदान शिबिराला येताना रुग्णांनी सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड आणावे अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.

      या भव्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी खिदमत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद आसिफ रजा, उपाध्यक्ष सादिक इकबाल थैम, सचिव वसीम इकबाल शेख,कोषाध्यक्ष नियाज अय्युब सय्यद यांचे सोबत साजिद पठाण, अन्सार हुसेन शेख ,तनवीर शेख, शोएब शेख हे परिश्रम घेत आहेत.