नेहरु माॅडर्न ईंग्लिश मिडीअम स्कूल च्या वतीने जन्माष्टमी साजरी Janmashtami celebration on behalf of Nehru Modern English Medium School

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.11 सप्टेंबर) :- नेहरु माॅडर्न ईंग्लिश मिडीअम स्कूल शेगाव बूज च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात नर्सरी ते केजी टू च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. बहुतांश विद्यार्थ्यांनी नृत्य व नाटीका सादर केली.

सरते शेवटी कृष्ण जन्म नाटीकाद्वारे सादर करुन दहीहंडी फोडण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहरू माडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक श्री प्रशांत व-हाडे सर, उद्घाटक गटशिक्षणाधिकारी श्री चहारे सर, प्रमुख पाहुने केंद्रप्रमुख राउत सर.

नेहरू शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष श्री शेरखाॅ पठान नेहरु विद्यालय चे मुख्याध्यापक श्री ढाकुणकर सर, श्री खेडीकर सर ,श्री वारे सर तसेच नेहरू मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलचे पालक शिक्षक संघाचे सहसचिव श्री अनंताभाऊ कोटकर ,सदस्य श्री उमेशभाऊ माकोडे.

सदस्य सुरक्षाताई ईखार तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी .कोटकर मॅम ,साळवे मॅम ,शेख मॅम, कळसकर मॅम ,सातपुते मॅम,गायकवाड मॅम,काथवटे मॅम ,चांदूरकर मॅम & आत्राम ताई उपस्थित होते .