डिजिटल मीडियाची ओळख सांगणार पुस्तक

165

✒️ चंद्रपूर ( chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.20 फेब्रुवारी) :- डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. अवघ्या काही दिवसातच डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकार, नवोदित, डिजिटल व्यावसायिक आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी या पुस्तकाची मागणी केली. मुळातच हे पुस्तक नव्या माध्यमाची कठीण आणि किचकट प्रक्रिया सोपी करणारं आहे. डिजिटल माध्यमांची संख्या प्रचंड वाढली आहे. इतकेच नव्हेतर सोशल आणि डिजिटल माध्यम वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

इंटरनेटच्या युगात डिजिटल मीडियात मोठे बदल होत आहेत. डिजिटल मीडियातील अनेक मार्गदर्शक साहित्य यू-ट्युब, वेबसाईटवर उपलब्ध आहे; मात्र, ते इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहेत. अनेकदा तांत्रिक शद्बाचा अर्थ सहज समजत नाही. मराठी माणसाला डिजिटल मीडिया सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेता यावा, यासाठी देवनाथ गंडाटे यांनी माहिती संकलित करून तयार केलेले पुस्तक मराठी माणसाला देणगीच ठरणार आहे.   

देवनाथ गंडाटे हे मुळात पत्रकार आणि वेबडिझायनर आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यताप्राप्त डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौंसिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेचे सदस्य आहेत. सन २००२ पासून पत्रकारितेत कार्यरत असून, चंद्रपूर, नागपूर, अलिबाग आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात पत्रकारितेचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक सकाळच्या विदर्भ आवृत्तीत १४ वर्ष पत्रकारिता केली.

सोबतच चंद्रपूर समाचार, चंद्रधून, कृषीवल, सकाळ आणि लोकशाही वार्ता आदी वृत्तपत्रात बातमीदार, उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, मुख्य वार्ताहर आदी पदांचा अनुभव आहे. नागपुरातील आयटी क्रॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून चंद्रपूर महानगरपालिकेत ‘कंटेंट एक्सपर्ट’ म्हणून कामाचा अनुभव पाठीशी आहे. नागपुरातील द पी.आर. टाईम्स तसेच टेक्नोव्हिजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन कंपनीत फ्री लॉन्सर कन्टेन्ट रायटर आणि वेब डिझाइनर म्हणून कार्यरत आहेत. विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे माध्यम व डिजिटल सल्लागार तसेच स्मित डिजिटल मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

वेबसाईट डिझाईन, सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया अभ्यास ते करीत असतात. हाच अभ्यास त्यांनी लोकांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात प्रामुख्याने सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया, गूगल आणि सेवा, फेसबुकचे प्रकार, ट्विटरचे महत्व, टेलिग्रामचे फायदे, व्हाट्सएप आणि बिझनेस व्हाट्सएपमधील फरक, युट्युब आणि त्यातून होणारी कमाई, ऑनलाईन उत्पन्नाचे स्रोत आणि लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. इतकेच नव्हेतर नव्या तंत्रज्ञानातील चॅट जीपीटी आणि युनिक मीडिया प्लॅटफॉम यावरही प्रकाश टाकला आहे.

© Devnath Gandate

Title: डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने

Language: Marathi

 प्रकाशन वर्ष 2023

किंमत ९९ रुपये

ISBN Number 978-93-5786-520-3 पुस्तक मिळवण्यासाठी 8605592830 यामोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा,