हर घर गोठा योजनेचा पशुपालक यांना लाभ द्या प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.30 जानेवारी) :- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हर घर गोठा ही महत्त्वाकांची योजना शासनाने पशुपालकासाठी सुरू केली.या योजनेचा लाभापासून पशुपालक वंचित राहत आहेत.त्यामुळे ही योजना प्रभावी व यशस्वीरीत्या चंद्रपूर जिल्हात राबविण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे ‌.

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक लहान मोठे शेतकरी , शेतमजूर पशुपालन करतात, यातून शेतीला जोडधंदा होतो. परंतु जनावरांचा गोठ्याकडे फार लक्ष दिले जात नाही. त्यामुळे ही जनावरे नेहमी ऊन वारा पावसात राहतात शासनाने रोजगार हमी योजनेतून सन २०२०-२१ मध्ये गोठा बांधकाम योजना सुरू केली.यासाठी ७०हजार रुपयांचे अनुदान आहे.जिल्हात गावागावांत वर्षाला पाच लाभार्थ्यांची निवड होते.यासाठी ग्रामपंचायत ठराव जोडून लाभार्थ्यांना पंचायत समिति कडे अर्ज सादर करावा लागते.

“हर घर गोठा योजनेची गतीने अंमलबजावणी होत नाही.त्यामुळे पशुपालकांचे गोठा बांधकाम अजूनही खोळंबले आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायी असलेल्या या योजनेची अंमलबजावणी व काही अटी शिथिल करुन मागेल त्याला गोठा परवानगी देण्यात यावी.तसेच बांधकाम साहीत्याचे वाढलेले दर पाहता मिळणाऱ्या अनुदान रक्कमेत बांधकाम होत नसल्याने अनुदान रक्कमेत वाढ करण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे”.