जिल्हा परिषदच्या शाळेच्या बालकांनी साधला पोलिस निरीक्षकासी संवाद

🔹महालगावची शाळा पोलिस स्टेशनच्या दारी 

✒️चिमूर (Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि .22 ऑक्टोबर) :- तालुक्यात जिल्हा परिषद शाळा महालगाव येथील विद्यार्थ्यांनी एक दिवसीय सहल आयोजित करीत चिमूर पोलिस स्टेशनला भेट देत पोलिस निरीक्षक मनोज गभने यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या व बालकांच्या प्रश्नांचे उत्तरे पण दिलीत 

       दिनांक २०/१०/२०२३ ला शुक्रवारी दु .३—४ च्या दरम्यान विद्यार्थांमध्ये पोलिस स्टेशन चिमूर अंतर्गत येणारे कायदे कानून, चोरी मारपिट किरकोळ भांडणे विद्यार्थाच्या दृष्टिने असलेले महत्व श्री.मनोज गभणे सर यांनी सविस्तर पणे व विद्यार्थांना समजेल असे स्पष्टपणे हितगूज वर्णन केले ,बिट जमादारांनी विद्यार्थांचे कौतूक करुन स्वागत कक्ष ,स्टेशन डायरी online कामे ,क्राईम बॅच दस्तवेज मालखाना ,पुरुष व स्री बंदीगृहाची माहिती सविस्तरपणे सांगितले सोबत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृन्दही होते ,विद्यार्थांच्या मनातील भिती त्याच्या हावभावाहून दिसत होते .

मुलींनी पोलिस निरीक्षक मनोज गभणें याना प्रश्न विचारुन मनसोक्त चर्चा केली व मनोज गभणे योग्य मार्गदर्शन करुन समजावून सांगितले ,ही चिमूर पोलिस स्टेशनला भेट देणारी पहिली शाळा ठरली. यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा महालगावचे मुख्याध्यापक रविंद्र उरकुडे. सहायक शिक्षक दुर्योधन चौधरी. सहायक शिक्षक संजय मेश्राम. उपस्थित होते.