आयुध निर्माणी कर्मचार्‍याची गळफास घेउन आत्महत्या An ordnance factory employee committed suicide by hanging himself

72

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.2 सप्टेंबर) :- भद्रावती येथील आयुध निर्माणी येथे दरबान पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने राहत्या घरी छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

 प्रतीक सुदर्शन चहांदे (३४) राहणार कटारिया लेआउट सुमठाणा असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा आयुध निर्माणी येथे दरबान पदावर कार्यरत होता. त्याच्यावर बँकेचे गृहकर्ज होते.

तसेच तो दारूच्या आहारी गेल्याने शुक्रवारला पहाटे घरातील सिलिंग फॅनला दोर बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती घरातील व्यक्तींना होताच त्यांनी भद्रावती पोलिसांना पाचारण केले. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.