टेकाडी परिसरात वाघाची दहशत .वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार Tiger terror in Tekadi area. A woman was killed in a tiger attack

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26 ऑगस्ट) :- भद्रावती तालुक्यात येत असलेल्या टेकाडी शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना उघडकीस आली . आपल्या शेतात निंदन करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने ती महिला ठार होण्याची घटना भद्रावती तालुक्यातील टेकाडी(दी.) शेतशिवारात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

      लक्ष्मीबाई रामराव कन्नाके (६०) रा. टेकाडी(दी.) असे मृत महिलेचे नाव असून ती आपल्या शेतात सुनेसोबत निंदनाचे काम करीत होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाली. आजुबाजुच्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने लक्ष्मीबाईला जागीच सोडून जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. 

      या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली.

घटनास्थळी टेकाडीचे पोलिस पाटील सुभाष झाडे, वनरक्षक जनबंधू, गणेश गायकवाड आणि इतर गावकरी उपस्थित झाले होते.