शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजित  जनसेवा सप्ताहाचा समारोप The public service week organized on the occasion of Shiv Sena chief Uddhav Thackeray’s birthday concluded

▫️आर्मी-पोलीस  भरतीपूर्व सात दिवशीय मोफत प्रशिक्षण शिबिर(Army-Police 7 days free training camp before recruitment)

????शिवसेना ( उ. बा.ठा.) व  रनर बॉयज आर्मी – पोलीस कॅरीयर अँकेडमीचा संयुक्त उपक्रम(Shiv Sena (U. Ba. Tha.) and Runner Boys Army – Joint initiative of Police Career Academy)

▫️वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन(Guidance of Varora-Bhadravati Assembly Constituency Chief Ravindra Shinde

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.2 ऑगस्ट) :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा- निमित्य वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात  जनसेवा सप्ताह साजरा करण्यात आला. वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात  या सप्ताहात दररोज विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

  आज  दि. २ ऑगस्ट  २०२३  बुधवार रोजी या सप्ताहाचा समारोप आर्मी-पोलीस  भरतीपूर्व सात दिवशीय मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करून करण्यात आला. सदर उपक्रम शिवसेना ( उ. बा. ठा.) व  रनर बॉयज आर्मी – पोलीस कॅरीयर अँकेडमी गवराळा यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. २ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत दररोज सकाळी ५ ते ८ वा. आणि दुपारी ३ ते ६ वा. या कालावधीत राबविण्यात येतील.

     वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात  सुरु केलेल्या या उपक्रमाचे उदघाटन आज दि. २ ऑगस्ट २०२३ रोज बुधवारला सकाळी सहा वाजता करण्यात आले. याप्रसंगी तालुका प्रुमुख नरेंद्र पढाल, सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी नगर सेवक प्रशांत कारेकर आणि प्रशिक्षणार्थी युवक व युवती  फार मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

युवक -युवतींनी प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा : रविंद्र शिंदे 

“देशसेवेत आर्मी आणि पोलीस  विभागाचे महान योगदान आहे. या योगदानाची तुलनाच इतरांशी होऊच शकत नाही. सदर प्रशिक्षणातून मिळणारे मार्गदर्शन आर्मी आणि पोलीस विभागात भर्ती होण्यासाठी प्रत्येकांना लाभदायक ठरणार आहे. यामुळे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शहरी व ग्रामीण युवक -युवतींनी प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा.याकरीता तालुका प्रमुख नरेंद्र पढाल ( भद्रावती )  शिवालय शिवसेना ( उ. बा. ठा. ) कार्यालय स्टेट बँक समोर,जूना नागपूर नाका  वरोरा आणि  रनर बॉयज आर्मी -पोलीस कॅरीयर अँकेडमी गवराळाचे करण उपरे यांच्याशी संपर्क साधावा . असे आवाहन रविंद्र शिंदे यांनी केले आहे. “