बापरे.. धक्कादायक बातमी. भद्रावतीमधे वेश्यव्यवसाय वर पोलिसांची धाड Wow shocking news. police raid on prostitution in bhadravati 

🔸वेशव्यवसाय चालवणाऱ्या मुख्य महिलेला अटक

🔹पीडित दोन महिलांची सुटका

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.18 मार्च) :-भद्रावती वरोरा रस्त्याकडे जाणाऱ्या एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती दिनांक १५/०३/२०१६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला कळताच त्यांनी पोलीस स्टेशन भद्रावती हधीत असणाऱ्या एका ठिकाणी धाड टाकून अवैधरित्या अनैतिक देहव्यापार करणाऱ्या एका महिलेला स्वत:चे आर्थीक फायदयाकरीता मुली व महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत होती तिला अटक केली तर दोन पिडीत महिलांना सोडून देण्यात आले. ही कारवाई बिपीन इंगळे, पोलीस निरीक्षक, पोस्टे भद्रावती आणि मंगेश भोयर सहा. पोलीस निरीक्षक स्थागुशा चंद्रपूर यांचे पथकाने केली. दरम्यान या वेश्याव्यवसायात पुन्हा किती महिला व मुली अडकल्या आहे याचा शोध सुरू आहे. 

पोलिसांनी भद्रावती ते वरोरा जाणा-या रोड चे बाजुला असलेल्या शेतशिवारातील एका घरावर छापा टाकून कारवाई केली असता त्या ठिकाणी एक स्त्री तिचे आर्थीक फायदयाकरीता दोन महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत असतांना मिळुन आली.

त्या महीलेस सोबतच्या महीला पोलीस अंमलदारांचे मदतीने ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन इच्छेविरूध्द देहव्यापार करवुन घेत असलेल्या दोन्ही पिडीत महीलांची सुटका करण्यात आल्याने न्यायालयाने आदेशाने त्या महिलाना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

अनैतिक देहव्यापार करवुन घेत असलेल्या महीले विरुध्द पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमाक १२४/२०२३ कलम ३७० भा.दं.वि. सह कलम ३, ४, ५ अनैतीक मानवी व्यापार (प्रतीबंधक) अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन भद्रावती करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार, स्थागुशा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक श्री बिपीन इंगळे, पोस्टे भद्रावती, सहायक पोलीस निरीक्षक श्री मंगेश भोयर स्थागुशा चंद्रपूर, स्थागुशा पोलीस अंमलदार स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, चंदु नागरे, अजय बागेसर, संदिप मुळे, प्रशांत नागोसे, दिनेश अराडे तसेच पोस्टे भद्रावती येथील पोलीस अंमलदार अनुप आस्टुनकर, विश्वनाथ चुदरी, रोहीत चिचगीरे, मोरेश्वर पिदुरकर, महीला अंमलदार सुषमा पवार, गिता उमरे, सोनु कोसरे यांनी केली.