भद्रावती जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

75

▫️पाच लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि .25 ऑगस्ट) :- मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरू असलेल्या जुगारावर धाड मारीत जुगार खेळणाऱ्या दहा आरोपींना भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे शहरातील सुमठाना परिसरातील एका घरात करण्यात आली. या कारवाईत मोबाईल, मोटरसायकल व नगदी रकमेसह एकूण चार लक्ष 97हजार,870 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेल्या 10 आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. सुमठाना परिसरातील एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करीत घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे दहा व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून नगदी रोख 30हजार670 रुपये, आठ मोबाईल व पाच मोटरसायकली असा 4लक्ष97हजार,870 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किटे यांच्या नेतृत्वात अंमलदार शशांक, अनुप, विश्वनाथ, निकेश व योगेश आदींनी केली.