महिला व युवकांचा प्रहार जनशक्ती पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश  A large number of women and youths joined prahar janshakti party

412

🔸प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड आढावा बैठक संपन्न 

✒️ चंद्रपूर ( chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

   चंद्रपूर(दि.10 मार्च) :-प्रहार जनशक्ती पक्षा मध्ये अनेक महिलांनी तसेच युवकांनी केला पक्ष प्रवेश केला.आणि अनेक विषयावर चर्चा झाली. लोकप्रिय माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या लवकरच चंद्रपूर गडचिरोली दौरा असल्याने रूपरेषा अपंग लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांचे हक्क याकरिताआढावा बैठक घेण्यात आली.उपस्थित सर्व प्रहारसेवक नागभीड बामणी .नागभीड.नवखळा.मांगली इथल्या इच्छुकांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केले.

पक्षप्रवेश करताना. प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर वाढवता येणार . यावर सर्व पदाधिकारी . जोमाने काम करीत आहे. याकरिता सर्वांचे आभार मानले.कार्यकारणी गठीत करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष . उपाध्यक्ष शहर प्रमुख आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

 प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड महिलांमध्ये . मा.महानंदा पुसाम यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यमु वाढई शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सविता बावणे शहर संघटक म्हणून यांची निवड करण्यात आली. सुरेश जी कोल्हे शहर संघटक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली .

विष्णू भांदाकर नवखळा उपशाखाप्रमुख. गौरव जांभुळे नवखळा शाखाप्रमुख .आकाश चौधरी नवखळा बूथ प्रमुख नानक नाकाडे.नागभीड प्रभाग क्रमांक 7 अध्यक्ष दिगंबर कंनकावार शहर उपप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली . तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी होते.