राष्ट्रिय बंजारा परिषदेची आर्णी येथे बैठक संपन्न,आर्णी नगरीतील भुमीपुत्राची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार व अनेक पदाधीकाऱ्यांची निवड करण्यात आली

✒️यवतमाळ(Yavtamal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि.13 ऑक्टोबर) :- दि.12 ऑक्टबर रोजी शासकीय विश्रामगृहात आर्णी येथे धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राष्ट्रीय बंजारा परिषदेची बैठक घेण्यात या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष गोर बाळुभाऊ राठोड यांनी केले होते. या बैठकित आर्णी नगरीचे भुमीपुत्र प्रा.प्रेमकिशनभाऊ राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषद उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रेमकिशनभाऊ राठोड यांनी समाजातील युवकांना सांगीतले की ऊच्छविचार सरणीचे युवक समाजात पुढे यायला हवे व त्यांच्या स्वरूपात समाजाचे उज्वल भवितव्य घडविता येते यावेळी गोर कवी दनकाकार संतोष आडे व हिरामन जाधव आर्णी नगरीतील अनेक समाजबांधव उपस्थित होते या बैठकित गोर सेनेच्या टीम कडुन उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

 या बैठकित राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य संघटक किसनभाऊ जाधव यांचे मार्गदर्शन लाभले व समाजात व्यसनाचे प्रमाने कमी करण्यासाठी प्रत्येक तांड्यात व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविण्याचे त्यांनी आव्हान केले.

या बैठकित यवतमाळ जिल्ह्याध्यक्ष गोर बाळुभाऊ राठोड यांनी सुत्रसंचालन केले.

यावेळी प्रकाशभाऊ राठोड यांची यवतमाळ जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली तसेच यवतमाळ तालुकाध्यक्ष पदी रवी भाऊ राठोड आर्णी तालुकाध्यक्ष सुमित जाधव महेश राठोड तालुका उपाध्यक्ष व महागाव तालुका उपाध्यक्ष अतुल राठोड यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे सर्व पदाधिकारी व बंजारा समाज बांधव उपस्थित होते.