भद्रावती वासियांनी अनुभवला ऐतिहासीक “दहीहंडी उत्सव” Bhadravati residents experience historic “Dahihandi Utsav”

139

▫️प्रथमदाच महिलांनी फोडली दहीहंडी,हजारो शहर वासियांची उपस्थिती(Dahi handi was broken by women for the first time, attended by thousands of city dwellers)

▫️शिवसेना ( उबाठा ) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांचे आयोजन(Organized by Shiv Sena (Ubatha) District Chief Mukesh Jeevtode)

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.10 सप्टेंबर) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी गोकुळाष्टमीचे औचित्य साधून गेल्या ३१ वर्षानंतर शहरात प्रथामदाच तालुका क्रीडा संकुल येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते..यामध्ये महिलांनी प्रथमदाच सहभाग घेत दहीहंडी फोडून इतिहास रचला.या भव्य दहीहंडी उत्सवाला शहर वासियानी भरभरून प्रतिसाद दिला.

शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेला हा दहीहंडी उत्सव अनेक वैशिष्टाचे संगम होता. पुरुष गटासाठी 33 फूट दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला रोख 51 हजार रुपये तर 26 फूट दहीहंडी होणाऱ्या पथकाला रोख 33 हजार रुपयाचे बक्षीस होते.

जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी महिलांच्या विनंतीला मान देऊन विशेष आकर्षण म्हणून महिला दहीहंडीचे आयोजन केले होते. यामध्ये महिला पथकांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस ठेवले होते. याचबरोबर लहान बालक बालिका युवक युवती व ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी श्रीकृष्ण मा राधा व माता यशोदा वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी लोकमत सखी मंच यांनी सहकार्य केले. या स्पर्धेला फक्त भद्रावतीच नव्हे तर वरोरा, चंद्रपूर येथील स्पर्धकांनी हिरहिरीने भाग घेऊन भद्रावती वासियांची मने जिंकली

तसेच सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या युवक युवतींसाठी दहीहंडी उत्सवाचे उत्कृष्ट रिल्स बनवण्यासाठी आकर्षक बक्षीस ठेवले होते. 

यासोबतच लाईव्ह ऑर्केस्ट्रा व लावणी नृत्याने भद्रावतीकरांना एका जागेवर खिळवून ठेवले होते. या दहीहंडी उत्सवाची सुरुवात विशेष आकर्षण असलेल्या महिलांच्या पथकांतर्फे करण्यात आली. प्रथमत:च महिला दहीहंडी फोडण्याचा मान भद्रावतीच्या हिरकणी महिला मंडळ व मनिकादेवि महिला मंडळ(पोलीस पथक) यांना मिळाला असून दहीहंडी फोडून या दोन्ही पथकांनी मनमुराद आनंद लुटून इतिहास रचला.

पुरुष गटासाठी ठेवलेली 33 फूट दहीहंडी कोणत्याही पथकाला फोडता आली नाही. परंतु जय महाकाली किडा मंडळ चंद्रपूर या पथकाने 26 फूट उंच असलेली दहीहंडी फोडून भद्रावती वासियांचे मन जिंकले. या दहीहंडी उत्सवाला हजारो भद्रावती वासियांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी भद्रावती वासियांचे आभार मानले. व पुढील काळात भद्रावतीकरांसाठी असेच नवनवीन उपक्रम राबविणार असल्याची ग्वाही याप्रसंगी दिली. 

दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख श्री मनिष जेठानी, माजी नगरसेवक दिनेश यादव , नागेंद्र ऊर्फ बंडु चटपल्लीवार, महेश जिवतोडे, , सुनीताताई खंडाळकर, जयश्रीताई कामडी, वर्षा ताई पढाल, मनिषाताई ढोमने, वंदना ताई ऊईके, कल्पनाताई गट्टुवार, स्वप्निल ऊपरे, जितेंद्र गुलानी, सरफराज खान पठाण, सुनील रामटेके, अरविंद खोबरे, दत्तु बोरसरे, अभिजीत शिंदे.

अरुण खोबरे, प्रकाश भंडारवार, सुनील देठे, संदिप मुडे , अमित निब्रड, सुधाकर भाऊ मिलमिले, दिनेश यादव, माजी नगरसेविका सुषमा भोयर, वरोरा शहर प्रमुख संदिप मेश्राम, संयोजक अतुल नांदे, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, वरोरा तालुका प्रमुख विपीन काकडे, कामगार सेना तालुका प्रमुख हनुमान ठेंगने, शिवदुत बालाजी रूयारकर, शिवदुत मनिष ठक यांनी अथक परिश्रम घेतले .