बुद्ध – भीम गीत स्पर्धेतून दिली बाबा साहेबाना आदरांजली

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.१४डिसेंबर) :- प्रतिभावंत प्रबोधनकार कला सहित्य संघ जिल्हा चंद्रपूर द्वारा नुकतेच भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गीत पुष्पांजली बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आला होता यात अनेक गायकांनी आपले गीत सदर करून बाबासाहेबाना पुष्पांजली वाहीली .

यात वरोरा तालुक्यातील राळेगाव येथील ग्रामीण भागातील सुप्रसिद्ध गायक श्री राजहंस डांगे यांनी व यांचे सहकारी गायक संदीप भिमटे , कवी नंदकिशोर शेंडे , सिद्धांत बैले , यांच्या टीम ने अनेक भीम गीत सादर करून बल्लारपूर येथील बोध्द उपासक उपसिका तसेच अनेक आंबेडकरवादी तरुणांना मंत्रमुग्ध केले . तेव्हा अनेक नागरिकांनी यांचे कौतुक करून अभिनंदन केले…