अंगणवाडीतील चिमुकल्या ताईंनी बांधल्या लहानग्या दादांना राख्या Rakhi for the little dada made by the little mothers in the Anganwadi

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि .30 ऑगस्ट) :- बहिण भावाच्या प्रेमाचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. बहिण भावाला मनगटावर राखी बांधते, तर भाऊ संकट समयी बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतो.

असा हा बहिण भावाचे नाते जपणारा सण घोडपेठ येथील अंगणवाडीत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अंगणवाडीत शिकत असलेल्या चिमुकल्या ताईंनी लहानग्या दादांना प्रेमाने राखी बांधत रक्षाबंधन हा सण साजरा केला.

घोडपेठ येथील अंगणवाडी क्र. ३ येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. बहिणींनी भावांची ओवाळणी केली. नंतर भावांना राखी बांधत पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमानंतर खाऊ वाटप करण्यात आला.

येथील अंगणवाडी कार्यकर्ती माला ताजणे, मदतनीस मंगला टेकाम, ग्रामपंचायत सदस्य सरोज रामटेके, तसेच मुलांचे पालक अमीतकुमार रामटेके, मोहनीश खिरटकर, सरीता नगराळे, अक्षता रामटेके आवर्जून उपस्थित होते.